कमीतकमी कचरा क्षेपणभूमीवर जाण्‍यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – आशि‍ष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2017

कमीतकमी कचरा क्षेपणभूमीवर जाण्‍यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – आशि‍ष शेलार


मुंबई । प्रतिनिधी -
एच/ पश्चिम विभागात कचरावर प्र‍क्रिया करुन त्‍याचे विघटन करण्‍याचे काम मोठया प्रमाणात गृहनिर्माण संस्‍था, सामाजिक संघटना व नागरिक यांच्‍यामार्फत सुरु असून यापुढील काळातही क्षेपणभूमीवर कचरा कमीतकमी जाण्‍यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन भाजपाचे स्‍थानिक आमदार व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. महानगरपालिकेच्या एच/ पश्चिम विभागाच्‍या वतीने ‘ कचरा व्‍यवस्‍थापनाबाबत फि‍रते प्रदर्शन’ आयोजित करण्‍यात आले असून या प्रदर्शनाचे लोकार्पण शेलार यांच्‍या हस्‍ते व प्रसिध्‍द अभिनेत्री दिया मिर्झा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्‍यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार आशिष शेलार यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, बोलण्‍यापेक्षा प्रत्‍यक्ष कृती करुन दाखविण्‍याचा हा उपक्रम असून या विभागातील नागरिक महापालिकेला सहकार्य करीत आहे याचा अतिशय आनंद आहे. त्‍याचप्रमाणे या विभागातील प्रत्‍येक जिमखाना हा स्‍वतः आपला कचरा विद्यटन करित असून ई/कचरा संकलन व विद्यटन सुध्‍दा प्रथमच आपल्‍या विभागात सुरु करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. ही मोहिम जोमाने आणखी पुढे कशी जाईल यासाठी सर्वांचे सहकार्य मिळणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रसिध्‍द अभिनेत्री दिया मिर्झा यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, महापालिकेतून नेहमी मला चांगल्‍या कामासाठी दूरध्‍वनी येत असून चांगल्‍या कामांमध्‍ये सहभागी होत असल्‍याबद्दल तिने महापालिकेचे आभार मानले. कचरा वर्गीकरणाच्‍या कामांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत आपल्‍याला जाऊन पोहचायचे असून यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सां‍गितले. त्‍यासोबतच आमची सोसायटी लवकरच शुन्‍य कचरा मोहिम राबविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

याप्रसंगी सुका कचरा संकलन करणाऱया तीन चाकी सायकलचे लोकार्पण प्रसिध्‍द अभिनेत्री दिया मिर्झा यांच्‍या हस्‍ते यावेळी पार पाडले. कार्यक्रमाला एच/ पूर्व व एच/ पश्चिम प्रभाग समिती अध्‍यक्ष संजय अगलदरे, नगरसेवक आसिफ झकेरिया, नगरसेविका अलका केरकर, हेतल गाला, स्‍वप्‍नाली म्‍हात्रे, मुमताज खान, एच/ पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्‍त शरद उघडे, बांबला फांऊडेशनचे आसिफ बांबला तसेच संबंधित अधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post Bottom Ad