डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 August 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 18 - महाराष्ट्र शासनाचे सन 2014-15 आणि 2015-16 चे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये सन 2014-15 चा शहरी विभागासाठी गणेश वाचनालय, नानल पेठ, परभणी आणि ग्रामीण विभागात रसिक रंजन वाचनालय, घुणकी, जिल्हा कोल्हापूर यांना अ वर्ग पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सन 2015-16 चा शहरी विभागासाठी अ वर्ग पुरस्कार देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय, पुसद, जिल्हा यवतमाळ यांना जाहीर झाला आहे.यासाठी प्रत्येकी 50 हजार रूपयाची पुरस्काराची रक्कम आहे. 

वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार राज्य शासनाकडून दरवर्षी दिले जातात.

जाहीर झालेले पुरस्कार :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार-2014-15
शहरी विभाग- 
सत्यशारदा सार्वजनिक वाचनालय, मातोश्रीनगर, परभणी यास ब वर्ग पुरस्कार, 30 हजार रूपये. सहकार महर्षी मा. बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड, जिल्हा औरंगाबाद यास क वर्ग पुरस्कार, 20 हजार रूपये. महेवी मुजप्फर हुसेन, लायब्ररी, मालेगाव,जिल्हा नाशिक यास ड वर्ग पुरस्कार, 10 हजार रूपये.

ग्रामीण विभाग- 
विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक वाचनालय, भीमनगर, सावंगी (मेघे)जिल्हा वर्धा यास ब वर्ग पुरस्कार, 30 हजार रूपये. शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय, धावज्याची वाडी, जिल्हा बीड यास क वर्ग पुरस्कार, 20 हजार रूपये. गोदावरी सार्वजनिक वाचनालय, नांदूर मधमेश्वर, ता. निफाड, जिल्हा नाशिक यास ड वर्ग पुरस्कार, 10 हजार रूपये.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार-2015-16शहरी विभाग-अभिषेक सार्वजनिक वाचनालय, राहुरी, जिल्हा अहमदनगर यास ब वर्ग पुरस्कार, 30 हजार रूपये. ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालय, कृषी सारथी कॉलनी, परभणी यास ड वर्ग पुरस्कार, 10 हजार रूपये.

ग्रामीण विभाग- 
विवेकानंद वाचनालय, आलमला, जिल्हा लातूर यास ब वर्ग पुरस्कार, 30 हजार रूपये. कर्मवीर मोफत वाचनालय, सुलतानगादे, ता. खानापूर जिल्हा सांगली यास क वर्ग पुरस्कार, 20 हजार रूपये.

डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार- 2014-15 राज्यस्तरीय पुरस्कार-
पुणे विभागातील विजयकुमार तुकाराम पवार, सह्याद्री शिक्षक कॉलनी, शिवाजी नगर, म्हसवड रोड, माळशिरस, जिल्हा सोलापूर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, 25 हजार रूपये पुरस्काराची रक्कम आहे.

विभागस्तरीय पुरस्कार- 
अमरावती विभाग- डॉ.राजनारायण सुपाजी गोमासे, मु. पो. विवरा, ता.पातुर, जिल्हा अकोला. औरंगाबाद विभाग - अनंतराव माणिकराव चाटे, मु.पो. वरवटी, ता आंबाजोगाई, जिल्हा बीड. नाशिक विभाग-सुरेश बाबुराव हराळ (हरेल) द्वारा जिजामाता ग्रंथालय,सातभाई गल्ली, राहुरी, जिल्हा अहमदनगर. नागपूर विभाग- सुभाष बलदार राव शेषकर, मु.पो. जिजाऊनगर, वडाळा(पैकू) ता.चिमुर जिल्हा चंद्रपूर. पुणे विभाग- लक्ष्मण नाना थोरात, श्री कान्होबा सार्वजनिक वाचनालय, चांडोली बु, ता.आंबेगाव जिल्हा पुणे. मुंबई विभाग-मधूसुदन रामचंद्र बागवे, मेघवाडी, डॉ. एस. एस राव रोड लालबाग, मुंबई. यासाठी प्रत्येकी 15 हजार रूपयाची पुरस्काराची रक्कम आहे.

पारितोषिक वितरण कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कार्थींना रोख रक्कम, शाल व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

Post Bottom Ad