राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2017

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणा

मुंबई 6 जुलै,
नागपूरातील 4 व राज्यातील अन्य उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन प्रस्ताव महानिर्मितीकडे पाठवण्याची सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.

नागपूर जिल्हयातील सिंचन समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी ही सूचना केली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर जिल्हयातील अंभोरा, सत्रापूर, लोधासितापार सारख्या उपसा सिंचन योजना सोलरवर आणण्याच्या विषयाबाबत झालेल्या चर्चेत राज्यातील ज्या उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणता येतील त्या योजना सोलारवर आणण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हे प्रस्ताव मंजूर करा. जलसंपदा विभागाने महानिर्मितीला तसे पत्र पाठवावे. ज्या उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागाला सौर ऊर्जेवर घ्यायच्या आहेत, त्या योजनाची यादी तयार करावी. उपसा सिंचन योजनाजवळ उपलब्ध असलेल्या शासकीय जागांवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना राबवता येईल. या योजनेसाठी जलसंपदाकडे जमीन उपलब्ध असल्यास ही जमीन देण्याची आपली तयारी असल्याचे जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांची सांगितले. तसेच उपसा सिंचन योजनांना 24 तास वीज पुरवठा देण्याची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री म्हणाले-या संदर्भात शासन सकारात्मक विचार करीत आहे.

Post Bottom Ad