मुंबई, दि.25 (प्रतिनिधी) - सलग पाच वेळा लोकांचा विश्वास जिंकणारा शिवसेना हा देशातील एकमेव पक्ष अाहे. या मुंबईचा इतिहास पाहीला तर पुर्वी ती कशी होती आणि आता काय आहे. इतक्या वर्षात शिवसेनेने मुंबईवर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. केवळ शिवसैनिकांनी मुंबईकरांसाठी झपाटून केलेल्या कामामुळेच हे साध्य होऊ शकले. याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
कुरारमध्ये श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय संचालित स्व. अविनाश साळकर वाचनालयाचे लोकार्पण उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. या वाचनालयाचे उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि अद्ययावत असे वाचनालय उभारण्याचे आश्वासन विभागप्रमुख आमदार सुनील प्रभु यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुरारवासीयांना दिले होते. या आश्वासनाची पुर्तता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते वाचनालयाचे लोकार्पण करून शिवसेनेने केली. माजी नगरसेविका सायली वारीसे आणि माजी नगरसेवक गणपत वारीसे प्रयत्नांनी तसेच आमदार सुनिल प्रभु यांनी सातत्याने पाठपुरावा करुन वाचनालयाची उभारणी केली. कार्यक्रमाला शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभू, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर, विधी समिती अध्यक्ष अॅ़ड. सुहास वाडकर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, विभाग संघटक नगरसेविका साधना माने, नगरसेवक आत्माराम चाचे, विनया सावंत, माजी नगरसेवक गणपत वारीसे, सायली वारीसे,प्रशांत कदम, संस्थेचे राजू मालोडकर यांच्यासह महीला व पुरूष उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना भारतीय विद्यार्थी सेना, शिवसैनिक यांच्यासह स्थानिक विभागातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचनालयाची ठळक वैशिष्ठे -
- मालाड पूर्व येथील आकांक्षा अपार्टमेंटमध्ये तब्बल साडेतीन हजार चौरस फूट जागेत हे वाचनालय साकारण्यात आले आहे.
-महापालिकेच्या सहकार्याने हे वाचनालय चालविण्यात येणार असून या वाचनालयात शालेय पाठ्यपुस्तके, ग्रंथ , संदर्भ पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
-स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी मोफत वायफायची सेवा.