जुलै महिन्यात स्वाईन फ्लूने ५ तर लेप्टोने ३ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2017

जुलै महिन्यात स्वाईन फ्लूने ५ तर लेप्टोने ३ जणांचा मृत्यू


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत पावसाळया आधीच स्वाईन फ्लू आणि इतर आजार वाढले होते. जून पर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूने १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जुलै महिन्यात स्वाईनफ्लूमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू प्रमाणेच लेप्टोस्पायरेसिसचा मुंबईला धोका वाढत असून जुलै महिन्यात लेप्टोने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. जीटी नगर येथील एका चाळीस वर्षीय महिलेला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पाण्यातून लेप्टोची लागण झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार १ जुलै ते २६ जुलै या कालावधीत मुंबईत स्वाईनफ्लूचे तब्बल ५३८ रुग्ण आढळले असून त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ५३८ पैकी ३७८ रुग्ण मुंबईमधील असून १६० रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. जानेवारी २०१७ पासून जुलै २०१७ पर्यंत ३०६४ रुग्णांना स्वाईन फ्लू लागण झाली असल्याचेहि आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. १६ ते १६ जुलै या दहा दिवसाच्या कालावधीत डेंग्यूचे २६९ रुग्ण आढळले आहेत. १ ते १५ जुलै पर्यंत मलेरियाचे ३०९ रुग्ण होते तर १६ ते २६ जुलै या कालावधीत मलेरियाचे २३२ रुग्ण आढळले आहेत. १ ते १५ जुलै पर्यंत गॅस्ट्रोचे ५४४ रुग्ण होते तर १६ ते २६ जुलै पर्यंत गॅस्ट्रोचे ३३९ रुग्ण आढळले आहेत. १ ते १५ जुलै पर्यंत हेपेटायसिसचे ८८ रुग्ण आढळले होते, तर १६ ते २६ जुलै या पर्यंत ४० रुग्ण आढळले आहेत. या महिन्यात सुरुवातील एकच कॉलराचा रुग्ण आढळला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Post Bottom Ad