गोरेगांवच्या नागरी निवारा 1200 सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर सुटला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2017

गोरेगांवच्या नागरी निवारा 1200 सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर सुटला


मुंबई - गोरेगांव(पूर्व)नागरी निवारा येथील 1200 सदनिकाधारकांचा सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न अखेर शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने सुटला आहे.शासनाने 7 जुलै 2017 रोजी नुकताच शासकीय अध्यादेश काढून हा प्रश्न निकाली काढला आहे.आमदार,विभागप्रमुख,माजी महापौर सुनील प्रभू यांच्या अथक प्रयत्नाने येथील 1200 सदनिका धारकांचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे.

नागरी निवारा हे व्हिएलसी कायद्याअंतर्गत बनवण्यात आलेला नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात आलेला यशस्वी गृहनिर्माण प्रकल्प आहे. येथील 1200हुन अधिक सदनिकांची खरेदी विक्री झाली होती.परंतू शासनाच्या काही अटी शर्तीमुळे सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न सुटत नव्हता.जे मूळ मालक उपलब्ध नाहीत आणि केवळ व्यवहार करून गेले आहेत त्यासाठी ही मोठी अडचण होती.

याप्रकरणी दिंडोशीचे शिवसेना आमदार,विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांनी कृतीसमितीला बरोबर घेऊन सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली.विधानसभेत विविध आयुधे वापरून आवाज उठवला,तसेच नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विद्यमान उपनागर जिल्हाधिकारी बिपेंद्रसिंग खुशवा आणि
माजी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्यासोबत सकारात्मक बैठका घेतल्या.

या महत्वाच्या प्रश्नाविषयी नागरी निवारा पुर्न:खरेदी सदनिका धारक कृती समितीच्या वतीने खासदार गजानन कीर्तिकर,आमदार प्रभू,माजी नगरसेवक सदाशिव पाटील, विधी समिती अध्यक्ष अँड.सुहास वाडकर,शाखाप्रमुख संदीप जाधव यांना यांचे जाहिर आभार मानले आहेत.समितीच्यावतीने शैलेश पेडामकर,मनोहर जाधव,दिलीप कांबळी, गणपती राजगिरे, विजय साळसकर, संजय पालव,राजेंद्र खामकर,प्रवीण तेली,निलेश मुणगेकर, नितीन मोहिते यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

Post Bottom Ad