मुंबई (प्रतिनिधी)- गोरेगाव पूर्व स्थानक ते संतोष नगर (विस्तारित) रिंगरूट बस सेवा सुरु करावी अशी मागणी संतोष नगर, श्री साई बाबा संकुल व दूरदर्शन वसाहतित तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार माजी महापौर मुंबई श्री सुनिल प्रभु महापौर असल्यापासून प्रयत्नशील होते. सदर सेवेसाठी सुनिल प्रभु बेस्टच्या अधिकाऱ्यांसोबत सतत सातत्याने पाठपुरावा करीत होते व त्यामुळे ४४७ बस वाहतूक कार्यान्वित केली.
या बस सेवेचा फायदा संतोष नगर, श्री साई बाबा संकुल व दूरदर्शन वसाहतीत व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांसह गोरेगाव चित्रनागरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणारच आहे; तसेच जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावरील वाहतुकीचा ताण काही अंशी कमी होणार आहे. ही बस वाहतूक चालू करून आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई श्री सुनिल प्रभु यांनी संतोष नगर, श्री साई बाबा संकुल व दूरदर्शन वासहतित राहणाऱ्या नागरिकांना दिलेले आणखी एक वचन पूर्ण केले.
या बस सेवेचा विशेष फायदा उच्चमध्यमिक शाळेसाठी संतोष नगर हुन पहाडी शाळेत जाणाऱ्या मुलांना होणार आहे. जन अरुण कुमार वैद्य मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकण्या पासून या मुलांची सुटका या विशेष बस सेवेमुळे होणार आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना देखील या सेवेमुळे दिलासा मिळाला आहे. कॉलेज मधील मुलांचा देखील प्रवास जलद होणार आहे. तसेच कामावर जाणाऱ्या महिलांना देखील फायदा होणार आहे.
गोरेगाव स्थानक पूर्व येथून सुटणारी ४४७ ही बस गोरेगाव स्थानक (पूर्व), गोरेगाव चेक नाका ते मोहन गोखले मार्ग, श्री साईबाबा संकुल, धीरज व्हॅली सोसायटी, दूरदर्शन वसाहत, हनुमान नगर, संतोष नगर, संतोष नगर (विस्तारित) असा रिंगरुट प्रवास करणार आहे. गोरेगाव स्थानक पूर्व येथून सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पहिली बस सुटेल आणि रात्री १० वाजून ०५ मिनिटांनी शेवटची बस सुटेल तर संतोष नगर विस्तारितद येथून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पहिली आणि रात्री १० वाजून ४० मिनिटांनी शेवटची बस सुटेल. या बसमार्गावरील बसगाड्या संपूर्ण आठवडा १३ ते २१ मिनिटांनी प्रस्थानांतराने उपलब्द असतील अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर बस सेवेचा शुभारंभ आमदार सुनील प्रभु यांनी आज दिनांक १० जुलै रोजी सकाळी या बस मधून प्रवास करून केला या वेळी स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, शाखा प्रमुख संदीप जाधव बेस्टचे वालावलकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.