मानवसेवा हीच खरी गुरुसेवा— आमदार सुनिल प्रभु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2017

मानवसेवा हीच खरी गुरुसेवा— आमदार सुनिल प्रभु


गुरुपौर्णिमे निमित्त वह्या, छत्री आणि व्हीलचेअर वाटप -
मुंबई - मानवाच्या आयुष्यात गुरूला खूप महत्व आहे.निर्गुंण,निराकारी परमेश्वराचे दर्शन गुरुमुळेच घडते.परमेश्वर हा जरी अदृश्य असला तरी त्याचे अस्तित्व सर्वत्र असते.त्यामुळे मानवसेवा हीच खरी परमेश्वराकडे रुजू होणारी गुरुसेवा आहे असे ठाम प्रतिपादन आमदार, विभाग प्रमुख सुनिल प्रभू यांनी गोरेगाव(पूर्व) आरे रोडवरील दत्त मंदिर येथे नुकतेच केले. येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे पौर्णिमेनिमित्त गरुजू, जेष्ठ नागरिक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना छत्रीवाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि अपंगांना व्हीलचेअर वाटप समारंभात आमदार सुनिल प्रभु बोलत होते. यावेळी स्थानिक नगरसेविका साधना माने मंडळाचे अध्यक्ष सुधाकर देसाई, विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. 

सुनिल प्रभु पुढे म्हणाले की, मला भेटणारा पत्येक व्यक्ती हा माझ्यासाठी माझा गुरू आहे, त्याच्या बोलण्यातुन, कृतितून नेहमीच काही न काही मला शिकायला मिळाले आहे... म्हणून प्रत्येक व्यक्तीत गुरूरूपी देव सामावला आहे असे मी मानतो. आज गुरू पौर्णिमा, ज्यांनी मला घडवल या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा...माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा, मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो, अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून साष्टांग नमस्कार...

माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाच्या राजकीय व सामाजिक आयुष्यातील हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या राजकीय व सामाजिक चळवळीतील गुरु असून शिवसेनाप्रमुखांचे विचार अजरामर आहेत. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन करून २०% राजकारण व ८०% समाजकारण असा मापदंड घालून दिला व मानवसेवेच्या भगव्याचा वसा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात रुजवला त्यांनी दिलेला वसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे समर्थ पणे पुढे नेत आहेत. शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेल्या समाजसेवेच्या मापदंडा नुसार आजचे हे वह्या वाटप, छत्री वाटप आणि अपंगांना व्हीलचेअर वाटपाचे कार्य केले जात आहे. उद्भवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक काम करत असून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकला असून २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभेवर भगवा फडकवावा हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी व महाराष्ट्र हे देशातील नंबर एक चे राज्य करणे हे उद्धवजी ठाकरे यांच्या दृष्टी क्षेपातील महाराष्ट्र बनवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक वचनबद्ध असून विधानसभेवर भगवा हीच खरी शिवसैनिकांनी साहेबांना गुरूपौर्णिमे निमित्त दिलेली गुरूदक्षिणा असेल असा ठाम विश्वास आमदार प्रभु यांनी यावेळी व्यक्त केला. व या पूढे म्हणाले की मी जरी या संस्थेचा मार्गदर्शक असलो तरी गेली १९ वर्षे या संस्थेचे गोरेगावातील गाय वासरू शिल्प प्रत्येक गोरेगावकराला जाता येता वात्सल्याची जाणीव करून देते ही गुरूदत्त सेवा संस्थेची मुंबईतील विशेषता आहे.

जेष्ठ नागरीकांना उद्देशून सुनिल प्रभु असे म्हणाले की, उन आणि पावसात आपले रक्षण ही छत्री करते आणि डोक्यावरील आधार म्हणून महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या छत्रीचा उपयोग आपल्याला निश्चित होणार असून आपल्या चेहऱ्यावरील समाधान हे आमच्या सारख्या राजकीय आयुष्यात कार्य करणाऱ्याना गुरुचरणी पोहचवणारी मानवसेवा आहे असे मी मानतो. अपंग सेवा हीच ईश्वर सेवा आणि विद्यार्थ्यांना सहयोग म्हणजे सरस्वतीची उपासना असते असा त्रिवेणी संगम या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात होत आहे असे उद्गार आमदार सुनिल प्रभु यांनी काढले

Post Bottom Ad