साई दर्शन इमारतीच्या दुर्घटनेला शिवसेना भाजपा युती जबाबदार - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2017

साई दर्शन इमारतीच्या दुर्घटनेला शिवसेना भाजपा युती जबाबदार - संजय निरुपम


दुर्घटनेतील मृतांना ५ लाख व जखमींना २ लाखांची मदत करावी
मुंबई - घाटकोपर येथे कोसळलेल्या साई दर्शन इमारतीच्या दुर्घटनेला शिवसेना-भाजपा युती जबाबदार आहे आणि सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या इमारतीखालीच तळमजल्यावर एका स्थानिक शिवसेना नेत्याचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना ही दुर्घटना झाली.या बांधकामाबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून ही त्यांनी या बांधकामावर कोणतीही कारवाई केली नाही. हॉस्पिटलचे बांधकाम करताना त्या स्थानिक शिवसेना नेत्याने त्या इमारतीखालचा पिलरसुद्धा हटवला आणि ती इमारत कोसळली. म्हणून या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांवर आणि त्या स्थानिक शिवसेना नेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्या पालिका अधिकाऱ्यांचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच या दुर्घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांना सरकारतर्फे ५ लाखाची आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत सरकारतर्फे देण्यात यावी व जखमींना सरकारतर्फे मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी संजय निरुपम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Post Bottom Ad