सिडकोचा भूखंड कमी किमतीत वाटप कारवाईस विलंब प्रकरणाची तातडीने चौकशी - डॉ.रणजीत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2017

सिडकोचा भूखंड कमी किमतीत वाटप कारवाईस विलंब प्रकरणाची तातडीने चौकशी - डॉ.रणजीत पाटील

मुंबई, दि. २५ - सिडकोमार्फत नवी मुंबईतील सी वूड सेक्टर ५८ मधील भूखंड व्हिनस सहकारी गृहनिर्माण संस्थेस कमी किमतीत दिल्या प्रकरणी अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल २९ मे २०१३ रोजी प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने नगरविकास विभागामार्फत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि, अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यास विलंब का झाला याची तातडीने चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले. विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. 

सदर संस्थेस २४ जानेवारी २००५ रोजी भूखंडाचे वाटपपत्र देण्यात सिडकोच्या २६.५.२००३ ते २८.१२.२००४ या कार्यकाळात झालेल्या भूखंड वाटपाची चौकशी करण्यासाठी शासनाने गठित केलेल्या डॉ. शंकरन समितीने सदर प्रकरण हाताळले नाही, अशी माहिती डॉ. पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील चर्चेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अतुल भातखळकर, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

Post Bottom Ad