मुंबई - पश्चिम रेल्वेवर एका तरुणीला बघून एक तरुण असतील चाळे करत असल्याचा प्रकार ताजा असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २९ जून रोजी पहाटेच्या सुमारास सुटणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक तरुण एका तरुणीकडे पाहत अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दोन्ही घटनेत रेल्वे पोलिसांनी दुर्लख केल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत कि बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना वाचवण्यासाठी आहेत असा प्रश्न महिला प्रवाश्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर रेल्वे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू लागल्याने अश्लील चाळे करणाऱ्या अशोक प्रधान यास तब्बल १३ दिवसानंतर जागे झालेल्या पोलिसांनी बुधवारी कर्नाक बंदर येथून अटक केली आहे.
Post Top Ad
12 July 2017
पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.