गाफील पहारेक-यांना शुल्कवाढ रोखण्यास अपयश -
मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील विरमाता जीजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन पाहणे व मॉर्निंग वॉकसाठीच्या शुल्कवाढीला भाजपाचा विरोध आहे. भाजपाचा विरोध असताना गुरुवारी पालिका सभागृहात भाजपाचे नगरसेवक गाफील राहिल्याने शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात शिवसेनेला यश आले आहे. महापालिका सभागृहाचे शुल्कवाढीवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने येत्या 1 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना पेंग्विन दर्शन आता महाग होणार आहे.
राणीबाग व पेंग्विन पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना लहान मुलाला २ रुपये तर प्रौढ व्यक्तीला ५ रुपये इतके शुल्क होते. राणी बागेतील पेंग्विन दालनाचे महिन्याला वीज बील दहा लाख रुपयाहून अधिक येत असून त्याच्या देखभालीसाठीही लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा करत प्रशासनाने राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरुन 100 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला. सत्ताधारी शिवसेनेचा महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणून याकडे पहिले जात असल्याने शिवसेनेने या दरवाढीला पाठिंबा दिला. बाजार व उद्यान समितीमध्ये या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. मात्र स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसने याला प्रखर विरोध केला. या विरोधामुळे प्रस्ताव रद्द होण्याची भीती असल्याने शिवसेनेने प्रौढ व्यक्तीसाठी घेण्यात येणारे १०० रुपये शुल्क ५० रुपये केले होते. यावेळी शिवसेना - भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. तरीही स्थायी समितीत हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केला होता. मात्र गुरुवारी सभागृहात भाजपा या प्रस्तावाला विरोध करेल असे अपेक्षित असताना हा प्रस्ताव सभागृहात पुकारल्यावर भाजपाच्या कोणत्याही सदस्यांनी साधा विरोधही केलेला नाही. यामुळे महापौरांनाही हा प्रस्ताव सहज मंजूर केला आहे. यामुळे सभागृहात राणीबागेची शुल्क वाढ रोखू अशी भूमिका घेणाऱ्या भाजपला सभागृहात मात्र हा प्रस्ताव रोखण्यात अपय़श आले आहे.
असे असेल शुल्कवाढ -
- राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : ५० रुपये
- तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
- पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
- खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.
- सकाळी सहा ते आठपर्यंत मॉर्निंगवॉकसाठी : मासिक १५0 रुपये.
- संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद
- ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
- फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
- व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी
- १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
- तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये.