सत्तेत सहभागी न केल्याने अत्याचारा विरोधात आंदोलन - तानसेन ननावरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2017

सत्तेत सहभागी न केल्याने अत्याचारा विरोधात आंदोलन - तानसेन ननावरे

मुंबई / प्रतिनिधी -
केंद्रात आणि राज्यात आरपीआय सत्तेत असली तरी सत्ता आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही. आरपीआयला १० टक्के सत्तेत सहभागी करण्याचे सत्ताधाऱ्यांनी मान्य केले असले तरी कार्यकर्त्यांना साधे एसईओ सुद्धा बनवण्यात आलेले नाही अशी खंत व्यक्त करत आम्ही सत्तेत असतानाही आम्हाला सत्तेत सहभागी करण्यात आले नसल्याने आम्ही लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन करत असल्याचे ननावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जयभीम बटालियनचे सोपान पवार, पोपटराव सोनावणे, नितीन मोरे, महादू पवार उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघातील जयभीम बटालियनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ननावरे बोलत होते. यावेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी सरकारच्या विरोधात बोलू शकतात. तर लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आम्ही सत्तेत असलो म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन का करू नये असा प्रश्नही ननावरे यांनी उपस्थिती केला आहे. यावर ननावरे यांचे हे मत त्यांचे वैयक्तिक असून या आंदोलनाचा आरपीआयशी काहीही संबंध नाही. हे आंदोलन सामाजिक संघटनेद्वारे आयोजित केल्याचे सोपान पवार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात चर्मकारांच्या १० संघटना आणि त्यामधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे अच्युतराव भोईटे यांनी सांगितले. यावर तानसेन ननावरे यांनी भोईटे यांना पत्रकार परिषदेत कशाला उगाच एका समाजाचा उल्लेख करत आहात आंदोलन सर्वच समाजाचे लोक उतरणार असल्याचे भर पत्रकार परिषदेत सुनावले आहे.

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद व इतरांची सुटका करावी, सहारनपूर दंगलीला जबाबदार आरएसएस - ब्राम्हणवादी योगी सरकार त्वरित बरखास्त करण्यात यावे, सहारनपूर मेरठ दलित हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करावी, हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना सरकारी नोकरी व २५ लाख रुपये मदत द्यावी, पूर्णा येथील बौद्ध कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेल्या ३०२ कलमान्वये खुनाचा रद्द करावा, बौद्ध वस्तीवर हल्ला करणाऱ्या जातीवाद्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागण्यांसाठी जयभीम बटालियनच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात १० जुलैला आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात ५० हजार लोक सहभागी होणार असल्याची माहिती ननावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post Bottom Ad