कर्जमाफीबाबत नुसत्या घोषणा, तात्काळ अंमलबजावणी का नाही - धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2017

कर्जमाफीबाबत नुसत्या घोषणा, तात्काळ अंमलबजावणी का नाही - धनंजय मुंडे


मुंबई दि. 24 - सरकारच्या दृष्टीने ऐतिहासीक, सरसकट, तत्वत: आणि निकषासहीत जाहीर केलेल्या कर्जमाफीला एक महिना होऊनही अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने या सरकारवरील शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नसल्याची टिका करीत सरसकट आणि कोणत्याही निकषाशिवाय तात्काळ कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करताना शेतकरी आणि विरोधी पक्षांच्या संघर्षामुळेच सरकारला कर्जमाफी जाहीर करणे भाग पडले. मात्र, जाणीवपूर्वक जाचक अटी, नियम लादून कर्जमाफीमासुन वंचित ठेवले जात आहे. आता नव्याने ऑनलाईनची अट कशासाठी? असा प्रश्नही उपस्थित केला. सरकारने जाहीर केलेले 10 हजार रूपये शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, पुर्नगठणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ असुन याबाबत तातडीने चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Post Bottom Ad