मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाला तरी अनेक दिवस पावसाने दडी मारल्यावर गुरुवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईत पावसाचा लपंडाव सुरु असताना मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख धरणांपैकी एक असलेले मोडक सागर धरण शनिवारी सकाळी ६.३२ वाजता ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे. दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी असलेले मोडक सागर धरण आज सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे दोन गेट उघडण्यात आले आहेत. या धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. या तलावापाठोपाठ मुंबईतील विहार तलावही लवकरच भरून वाहण्यास सुरुवात होणार आहे. मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलश लिटर पाणीसाठा असणे अवाश्यक आहे. १५ जुलैच्या पहाटेच्या ६ वाजताच्या पाण्याच्या अहवालाप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८ लाख ९९ हजार ३३८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २३९ दिवस पुरु शकतो . मुंबईत पाण्याची मागणी दररोज ४२०० दशलश लीटर एवढी असली तरी मुंबईला दररोज ३७५० दशलश लिटर पाणीपुरवठा होतो.
दररोज २५ ते ३० टक्के म्हणजे ९०० लिटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात असते. अपु-या पावसाने २०१५ मध्ये मुंबईत पाणी कपात करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईकरांना वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला होता. परंतु गेल्यावर्षी तलाव परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याचे टेन्शन कमी झाले. दरम्यानच्या काळात मध्य वैतरणा धरणात पाणी साठा करण्यास सुरुवात करून मुंबईचा जलसाठा वाढवला.
धरण 24 तासात पडलेला पाऊस सध्या तलावातील साठा
मि . मी . दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा ८८ ८४३७७
अप्पर वैतरणा ८८ ८४३७७
मोडक १२३ १२८६९२
तानसा ६९ ११७६४८
मध्य वैतरणा ९६ १७८४६०
भातसा ९५ ३७४३९७
विहार १०५ ११७१८
तुलसी ९४ ४०९५
एकूण ६२.१४ ८९९३३८
एकूण ६२.१४ ८९९३३८