माटुंगा रेल्वे स्थानकातून महिला सबलीकरणाची सुरवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2017

माटुंगा रेल्वे स्थानकातून महिला सबलीकरणाची सुरवात


स्थानकाचा कारभार ३० महिला कर्मचाऱ्यांच्या हाती -
मुंबई / प्रतिनिधी - महिलांचे सबलीकरण केले पाहिजे अश्या सर्वत्र नुसत्या बाता मारल्या जातात प्रत्यक्ष कृती मात्र केली जात नाही. अशी परिस्थिती असताना मध्य रेल्वेने आपल्या माटुंगा रेल्वे स्थानकातील सर्व कामाकरिता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला सबलीकरणाच्या नुसत्या बाता न मारता मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीमधून सुरवात केली आहे. माटुंगा स्थानकात प्रवाशांना तिकीट देण्यापासून ते प्रवाशांची सुरक्षा ठेवण्याचे काम ३० महिला अधिकारी कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातून दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. या स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी - कर्मचारी पाहत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ तिकीट आरक्षण कर्मचारी, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ ‘पॉइंट्समन’ यांचा समावेश आहे. तर प्रवाशी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने ५ महिला अधिकारी - कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत.

३० जून रोजी मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाची स्टेशन मास्तर म्हणून ममता कुलकर्णी यांनी जबाबदारी स्वीकारली. ‘तेव्हापासून आपल्याला इतर महिला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळते आहे. आम्ही सर्व महिला कर्मचारी असल्यामुळे एकमेकांच्या समस्या, प्रश्न एकमेकांकडे विनासंकोच व्यक्त करतो,’ असे कुलकर्णी यांनी आपला अनुभव मांडताना सांगितले. ‘मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी आमच्यावर विश्वास दाखवून अख्खे स्थानक आमच्या ताब्यात दिले. त्यांचा विश्वास आम्ही निश्चतपणे सार्थ ठरवू,’ असा विश्वास स्थानकाच्या मुख्य तिकीट पर्यवेक्षक नीता रमेश मोटाबाई यांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad