आरजे मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2017

आरजे मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई


पालिकेच्या स्थायी समितीत नगरसेवकांचा आरोप -
मुंबई / प्रतिनिधी - रेड एफएम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मलिष्का हिने "मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाही काय" हे गाणे गायले आहे. या गाण्यामधून मलिष्का हिने महापालिकेचे कारभाराचे वाभाडे काढले आहे. मलिष्काने केलेल्या टिकेने पालिका प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवडे निघाल्याने सत्ताधारी शिवसेना मलिष्कावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप पालिकेच्या स्थायी समितीत काँग्रेस, राष्टवादी, भाजपाच्या सदस्यांनी केला. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीत मलिष्कावर होत असलेल्या कारवाई बाबत हरकतीचा मुद्दा मांडला होता.

मलिष्काच्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय ?’ या गाण्याला मुंबईकर नागरिकांकडून व सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळत आहे. मलिष्काने गायलेले हे गाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसनेच्या जिव्हारी लागले आहे. मलिष्काच्या या गाण्यामुळे महापालिकेची बदनामी झाल्याने रेड एफएमवर व मलिष्कावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांच्यावर ५०० कोटींचा दावा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर व अमेय घोले यांनी आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्ताना पत्रही दिले आहे. याच दरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी मलिष्काच्या आईच्या घरी पाहणी करून घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्या प्रकरणी नोटीस दिली आहे. पालिकेने मलिष्काच्या आईला डेंगू प्रकरणी दिलेल्या नोटीसीचा मुद्दा आज पालिकेच्या स्थायी समितीत चांगलाच गाजला.

अभिव्यक्तीस्वातंत्र्यानुसार आर जे मलिष्काने व्हिडिओ बनवला हा लोकशाहीमधील अधिकार आहे. यामुळे पालिकेने आपली बदनामी झाली म्हणून सूडबुद्धीने एका दिवसात मलिष्काचे घर शोधून तिच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याप्रकरणी नोटीस दिली आहे. हि कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी पालिकेने अशी सूडबुद्धी करून उत्तर द्यायची गरज नव्हती, मुंबईत खड्डे पडल्याने अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. लोकांचे मनके तुटत आहेत लोक मरत आहेत. लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे. अश्यावेळी प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवून उत्तर द्यायला हवे होते. पालिका प्रशासनावर टिका होत असताना शिवसेना हि टीका आपल्यावर का घेते असा प्रश्न उपस्थित करत व्यक्ति स्वातंत्र असल्याने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या लोकांना टार्गेट करू नये असे आवाहन कोटक यांनी केले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी मलिष्काने रस्ते खराब असल्याचे मत मांडले असताना तिच्यावर दबाव आणणे चुकीचे असल्याचे सांगितले. प्रशासन चुकीचे करत असाल तर त्याच्यावर वाचक ठेवा आम्ही आपल्या सोबत आहोत. लोकशाही मध्ये पेपरमधूनही टिका केली जाते मग वृत्तपत्रानाही नोटिस देणार का ? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईकरांचे हाल होत आहेत ते सुधारा असे आवाहन विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले.

भाजपाचे नागरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मलिष्काने गाणे गायले म्हणून तत्परतेने तिच्या विरोधात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याची कारवाई केली जाते. मग तितकीच तत्परता अनेक रस्ते अर्धवट आहेत त्यांचे काम कररतान तितकी तत्परता का दाखवली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. अधिकारी साईटच्या नावाने जातात कुठे याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केल. तर याला उत्तर देताना शिवसेना सभागृह नेते यशवंत जाधव यांनी पालिकेने मलिष्काविरोधात कारवाई केली नसून तिच्या आईच्या घरावर कारवाई केली आहे. मलिष्काला काही तक्रार होती तर तिने पालिकेकडे किंवा आयुक्तांकडे करायला हवी होती. डेंग्यू प्रकरणी कारवाई झालेली मलिष्का हि पहिली सेलेब्रिटी नाही या आधीही ऋषी कपूर सारख्या सेलिब्रिटींवरही कारवाई झाल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. मलिष्काच्या आईच्या घरात अनधिकृत बांधकाम झालायची माहिती उपलब्ध झाली असून त्यावरही कारवाई केली जाईल, मलिष्काच्या गाण्यामागे कोण बोलविता धनी कोण आहे असा प्रश्न उपस्थित करत या मागे राजकारण असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना करत असलेल्या कारवाईचा निषेध सर्व पक्षीयांनी केला आहे.

Post Bottom Ad