जकात परतावा करण्यासाठी पालिकेचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2017

जकात परतावा करण्यासाठी पालिकेचे आवाहन

मुंबई - वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर जकात बंद करण्यात आली. आयातदार, निर्यातकार व वाहतुकीवर यांनी यावेळी विविध सुविधा घेतल्या होत्या. त्या बंद करण्यासाठी पालिकेने ८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुदतीत संबंधितांनी पालिकेच्या कांजूरमार्ग येथील लोढा संकुल, एॅंमेनिटी बिल्डींग पहिला मजला, गेट क्रं-३ करनिर्धारक व संकलन (जकात) कार्यालयात किंवा ०२२ - २५७७०११० या दुरध्वनी क्रमांकावर तसेच dyacoctroiho@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सोमवार ते शुक्रवार तसेच पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार सकाळी ११ ते ५ या वेळेत हे कार्यालय सुरु राहील. मात्र यावेळी सामान, वस्तू, पदार्थ मुंबई बाहेर घेऊन गेल्यास त्याबाबतचा परतावा दिला जाणार नाही. याची आयातदार, निर्यातदार व वाहतूकदारांनी नोंद घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

Post Bottom Ad