मुंबई, २० जुलै २०१७: कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड यांनी 'फेंक मत मुंबई' या कचरा विरोधी कँपेनला पश्चिम मुंबईत जोरदार सुरुवात केली आहे. ‘फेक मत मुंबई’ ही कँपेन शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल, आणि त्यांना या कँपेनचे अॅम्बेसेडर बनवेल, ही मुले मुंबईतील नागरिकांना शहर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक करतील.
कँपेनचा हेतू मुंबईकरांच्या स्वभावात बदल घडवून आणणे आहे, यामुळे मुंबई खात्रीने एक स्वच्छ शहर होईल. कँपेन तरुणांना शिक्षण देईल आणि समाजात चांगल्या स्वच्छतेबाबत जागरुकता पसरवण्यासाठी प्रशिक्षणही देईल आणि विविध उपक्रम आणि जागरुकता चळवळीतून त्याची अंमलबजावणी घडवून आणिल.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, अ आणि फ वॉर्डातील २०० शाळा आणि महाविद्यालये सामील होतील, यावेळी त्यांना जागरुकता उपक्रमा साठी सहभागी करणार. मुंबईतील दुसऱ्या वॉर्डांतही अनुक्रमे अशाच प्रकारे काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात हा उपक्रम ३ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यां पर्यंत पोचवला जाणार आहे, यासाठी शाळानिहाय कार्यक्रम व उपक्रमांची श्रेणी सादर केली जाईल. पोस्टर बनवण्याची स्पर्धा, प्रश्नोत्तरं स्पर्धा, ‘झिरो-लिटर-वीक’ कँपेन आणि पथनाट्य इत्यादी.. या दोन्ही वॉर्डातील प्रमुख शाळा, महाविद्यालये महिंद्रा हॉलिडेज आणि सीआयआय द्वारे कँपेनचे महत्त्व पटवून देतील व त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतील.
फेंक मत मुंबई कँपेनचे अध्यक्ष आणि महिंद्रा हॉलिडेजचे अध्यक्ष अरुण नंदा म्हणाले की, '’आमचा जागरुकतेवर आणि स्वभावातील बदलावर विश्वास आहे, या दोन्ही गोष्टी अगदी लहान वयातच होणे गरजेचे आहे. लहान मुले चांगले परिवर्तन घडवणारी असतात, ती दुसऱ्यावर परिणामही घडवू शकतात. असे असले तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की आम्ही केवळ जागरुकताच नाही तर समाजाला स्वच्छ राखण्याची सवयही लावणार आहोत.’’
सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन्स (एसबीसी३) द्वारे उपक्रम राबवते. प्रामुख्याने स्थानिक संस्थांबरोबर जागरुकता करण्यासाठी संस्थां काम करते, व स्वच्छतेचे महत्त्व याद्वारे स्थानिकांचा सहभाग घेऊन देशभर कँपेन राबवते.