मुंबई, दि. ११ - दादर ते प्रभादेवी दरम्यानची वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस बृहन्मुंबई महापालिका,बेस्ट यांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली. वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
बैठकीत आमदार सदा सरवणकर, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, परिहवन आयुक्त प्रवीण गेडाम, उपायुक्त पुरूषोत्तम निकम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाने, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. त्रिपाठी, बेस्टचे अधिकारी व्हि.एस. नागावकर, संजय दराडे, अतुल पाटील,ल.पं. चौधरी, चं.वा झांबरे आदी अधिकारी उपस्थित होते.
सिद्धीविनायक मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी टॅक्सी स्टँड हलविणे, स्काय वॉक तयार करणे, लगतच्या जागा ताब्यात घेणे, भाविकांच्या सुविधेसाठी सरकते जीने आदींसह एस.के. भोले रस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्यासंदर्भात अभ्यास करण्याचे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या बैठकीत दिले.