मुंबई - पावसाळयात दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात. रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यासाठी पालिकेने इस्त्रायली आणि ऑस्ट्रियन कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान विकत घेतले आहे. हे तंत्रज्ञान पालिकेने घेऊन एक महिना झाला तरी याचा वापरच केला गेला नसल्याने हे कोल्डमिक्स गोदामात पडून आहे. 36 टन कोल्डमिक्स पैकी 80 टक्के कोल्डमिक्स पावसाळ्यात व 20 टक्के कोल्डमिक्सचा वापर गणेशोत्सवात पडणाऱ्या पावसात रस्त्यावर वापरले जाणार आहे. हे कोल्डमिक्स येत्या दोन ते तीन दिवसात पालिका विभाग कार्यालयाकडे पाठवले जाणार असून त्यानंतर खड्डे बुजवले जातील अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडू नये यासाठी पालिकेने परदेशातून कोल्डमिक्स तंत्रज्न्यान मागवले. भर पावसात हे कोल्डमिक्स रस्त्यावर टाकल्यास रस्त्यावर खड्डे पड़त नाही. मात्र मुसळधार पाऊस पड़त असतानाही हे कोल्डमिक्स वरळीच्या गोदामात वापराविना पडून आहे. आता महिनाभरानंतर हे कोल्डमिक्स वॉर्डनिहाय वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सद्या रस्ते उकरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे कोल्डमिक्सचा वापर केला जाणार आहे. खड्डे पडण्यापूर्वी भर पावसात हे वापरणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणात हे कोल्डमिक्स गोदामात वापराविना पडून राहिले आहे. आता वार्डनिहाय वाटप झाल्यानंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात केली जाणार आहे. 80 टक्के आता व 20 टक्के कोल्डमिक्स गणेशोत्सवाच्यावेळी रस्त्यावर वापरण्यात येणार आहे. यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपले. ठिकठिकाणी पाणी भरले होते. सद्या तीन चार दिवसापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे.पावसामुळे रस्त्यांची चाळण होण्यास सुरूवात झाली आहे. असे असताना इस्त्रायली 36 टन कोल्डमिक्स वरळीच्या अस्फाल्ट प्लांटमध्ये गेल्या 21 जून रोजी उपलब्ध होऊनही ते वापराविना तसेच पडून आहे. कोल्डमिक्स हे कोणत्याही वातावरणात रस्त्यांतील खड्ड्यावर वापरता येते. मात्र पावसाळ्यात रस्ते उकरायला लागले असतानाही कोल्डमिक्सचा वापर का होत नाही या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.