अस्वच्छता पसरवणाऱ्यांकडून 9 कोटी रुपये दंडाची वसुली -
मुंबई - मुंबईत अस्वच्छता पसरवणा-य़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने क्लीन अप मार्शल नियु्क्त केले आहेत. मागील वर्षभरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणा-यांकडून क्लीन अप मार्शलनी 9 कोटी रुपये दंडाची वसुली केली आहे. या क्लिनअप मार्शलची मुदत संपल्याने एक वर्षानी मुदत वाढ देण्याच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. या मुदत वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्याने क्लिनअप मार्शल योजनेला एक वर्षाची मुदतवाढ मिळावी आहे.
मुंबईतील पर्यटन स्थळ, रेल्वे स्थानक व गर्दीच्या ठिकाणी थुंकणा-या, कचरा फेकणा-यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभरापूर्वी 753 क्लिनअप मार्शलची पालिकेने नियुक्ती केली. महापालिकेच्या 24 विभागामध्ये 22 खासगी संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. याच कंत्राटाची मुदत अजून एक वर्षांनी वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-य़ांवर क्लिनअप मार्शलकडून दंड वसूल केला जातो. मागील एक वर्षाच्या कालावधीत क्लिनअप मार्शल विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेक़डे नोंद झाल्या आहेत. मात्र स्वच्छ भारत अभियानाला क्लिनअप मार्शल योजनेची मदत होणार असल्याने ही योजना बंद न करता चालू ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. क्लिनअप मार्शलना 100 ते जास्तीच जास्त 1000 हजार रुपयांपर्यंतच दंड आकारण्याचे अधिकार असणार आहे. सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करणा-यांवर आतापर्यंत सुमारे 9 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यातील 50 टक्के म्हणजेच 4.50 कोटी एवढी रक्कम नियमानुसार हिस्सा म्हणून महापालिकेला मिऴाला आहे.