पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बंगळुरूची संस्था मध्यान्ह भोजन देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2017

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बंगळुरूची संस्था मध्यान्ह भोजन देणार


निविदा न मागवल्याने काँग्रेसचा विरोध - 
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासाठी बंगळुरूच्या संस्थेला मध्यवर्ती ठिकाणी किचनसाठी जागा देण्यासाठी गटनेत्यांच्या बैठकीत बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. बंगळूरची ही संस्था सुरुवातील पाच हजार विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन देणार असून तीन महिन्यांनी ५० हजार विद्यार्थ्यांना मोफत भोजन पुरवणार आहे. मात्र पश्चिम उपनगरांतील एका पंचतारांकीत हॉटेलची ३० हजार चौरस फूट जागा ‘सेंट्रल किचन’म्हणून वापरणार असल्याने याबाबत निविदा का मागवल्या नाहीत, या जागेचा भविष्यात व्यावसायिक वापर कशावरुन होणार नाही, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने या प्रस्तावाला विरोध केला आहे. काँग्रेस आणि मनसेचा विरोध असला तरी सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आहे. यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना बंगळूरच्या संस्थेचे भोजन दिले जाणार आहे.

बंगळुरू येथील ‘अक्षयपात्र फाऊंडेशन’ या संस्थेने पालिकेच्या शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांना ‘सकस आहार मध्यान्ह भोजन देण्याची तयारी दर्शवली आहे. सुरुवातीला पाच हजार विद्यार्थ्यांना भोजन देण्याची तयारी दाखवणारे पत्र या संस्थेने महापालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांना पाठवले आहे. सभागृह नेत्यांनी ते पत्र महापौरांना पाठवून त्यावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गटनेत्यांनी यावर चर्चा केली. यावेळी बंगळुरुच्या संस्थेला सेंट्रल किचनसाठी देण्यात येणारी जागा पंचतारांकीत हॉटेलची असून, ही जागा देण्यासाठी निविदा का मागवल्या नाहीत, असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला व या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी होणार नाही, असे प्रश्न रवी राजा आणि मनसेचे गटनेते दिलिप लांडे यांनी उपस्थित करत आपला विरोध दर्शवला आहे.

जागेचा ‘किचन’ म्हणून करण्यात येईल तोवर ही जागा संस्थेला - 
पालिकेतील विद्यार्थ्यांना भोजन देण्यासाठी पश्चिम उपनगरांतील एका हॉटेलची तीस हजार चौरस फूट जागेचा वापर सेंट्रल किचन म्हणून वापर करण्यात येणार आहे. जोपर्यंत या जागेचा वापर ‘किचन’ म्हणून करण्यात येईल तोवर ही जागा संस्थेला देण्यात येणार आहे. या संस्थेने भविष्यात तीन महिन्यानंतर ५० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मोफत देण्याची तयारी दाखवली आहे. संस्थेचा हा उदात्त हेतू पाहता हा ‘प्लॉट’ देण्यात येणार आहे.
- विश्वनाथ महाडेश्वर
महापौर, मुंबई

Post Bottom Ad