दहिसरमधील विकासकामे रखडल्याने नगरसेवकांची आयुक्तांकडे धाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2017

दहिसरमधील विकासकामे रखडल्याने नगरसेवकांची आयुक्तांकडे धाव


मुंबई / प्रतिनिधी - महापालिकेच्या दहिसर आर उत्तर विभागातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी सूचित केलेली कामे रखडली आहेत. कमी दराच्या निविदा आल्याने महापालिका प्रशासनाने पुनर्निविदा काढणार असल्याचे जाहीर केले. यामुळे कामे मार्गी लागण्यास आणखी वेळ लागणार असल्याने पालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणा विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन एक निवेदन दिले आहे. या प्रकरणात पालिका आयुक्तांनी कार्यवाही करून नगरसेवकांना दिलासा देण्याचे साकडे घालण्यात आले आहे.

महापालिका निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमधील विकासकामे आपल्या नगरसेवक निधीतून करण्यासाठी आर उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याकडे प्रभाग समितीमध्ये मंजुरीसाठी पाठवली. प्रभाग समितीत ही कामे मंजूरही झाली. मात्र या कामांसाठी कमी दराने निविदा आल्याने पुनर्निविदा (रिबीडिंग) करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी नगरसेवकांना सांंगितले आहे. यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. याची दखल घेत प्रशासन आडमुठेपणा करीत असल्यामुळेच विकासकामे रखडल्याचे सांगत शिवसेना नगरसेवक संजय घाडी यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. पुनर्निविदा काढण्याचा निर्णय घेताना सहाय्यक आयुक्तांनी कुठल्याही पक्षाच्या नगरसेवकाला विश्वासात न घेता मनमानीपणे निर्णय घेतला. सहाय्यक आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी घाडी यांच्या हरकतीच्या मुद्याला पाठिंबा दिला. यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवत या प्रकारची सखोल चौकशी करून माहिती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दरम्यान या प्रकरणी शिवसनेच्या प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेवक संजय घाडी, बाळकृष्ण ब्रिद, हर्षद कारकर, सुजाता पाटेकर, तेजस्वी घोसाळकर, गीता सिंघण, रिद्धी खुरसुंगे, संध्या दोशी, भाजपाचे जगदीश ओझा, जितेंद्र शहा इत्यादी नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देण्यात आले असून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

Post Bottom Ad