भीम आर्मीचे दिल्लीत १६ जुलैला निळे वादळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 July 2017

भीम आर्मीचे दिल्लीत १६ जुलैला निळे वादळ


मुंबई - उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात झालेल्या दलित अत्याराच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी आणि त्यातून निर्माण झालेल्या भीम आर्मीचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांची सुटका करण्याच्या प्रमुख मागणीसाठी भीम आर्मीचे निळे वादळ १६ जुलै रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर पुन्हा एकदा घोंगावणार आहे. दिल्ली येथे १६ जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्यात राज्यातून हजारो तरूण सहभागी होतील अशी माहिती भीमआर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात झालेल्या दलित अत्याराच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी आणि त्यातून निर्माण झालेल्या भीम आर्मीचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांची सुटका करण्याच्या प्रमुख मागणीसाठी भीम आर्मीने १६ जुलै रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे प्रदर्शन. यात देशासह राज्यातीलही हजारो तरूण सहभागी होणार असून त्यासोबतच अनेक दलित खासदार, आमदारांनीही या मोर्च्यात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची शक्यता आहे असे कांबळे यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सहारनपूर दलित अत्याचाराचे देशभरात पडसाद उमटले आहेत. भाजपशासित राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्रसह हरियाणा आदी राज्यात दलितांवर मोठ्या प्रमाणात गोरक्षक आणि इतर कडव्या हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ले केले जात आहेत. याविरोधात लढण्यासाठी भीम आर्मी या आक्रमक संघटनेमुळे तरुणांना बळ मिळाले असल्याने ते मोठ्या प्रमाणात यामध्ये सामील होत आहेत. विविध आंबेडकरी, दलित संघटनाही यासाठी एकटवल्या आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी शाखा स्थापन केल्या जात आहेत असे कांबळे यांनी सांगितले.

मोर्च्यासाठी पुणे, औरंगाबाद, नागपूर, लातूर आदी ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका असून त्याच प्रमाणे अहमदाबाद, भोपाळ आदी शहरांमध्ये भीम आर्मीच्या दिल्लीतील मोर्च्याच्या नियोजनासाठी बैठकांचे आयोजन केले जात असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

“भीम आर्मी”च्या प्रदेश कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन - 
भीम आर्मीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे येत्या सोमवारी १० जुलै रोजी दुपारी २ वाजता मुंबईच्या कुर्ला या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, कुर्ला पूर्व जुनी केदारनाथ शाळा, नेहरू नगर येथील सानिद्ध कला केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित राहणार असून सदर प्रसंगी या संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना यावेळी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ८४२४०१०७८४ व ९२२१११६१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अशोक कांबळे यांनी केले आहे.

रमाबाई आंबेडकर नगरात भीम आर्मी -
दरम्यान ११ जुलै रोजी रमाबाई नगर हत्याकांड च्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी दुपारी २ वाजता रमाबाई कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहणार आहे. विद्रोही शाहीर संभाजी भगत हे यावेळी कलेच्या माध्यमातून हत्याकांडातील शहिदांना आदरांजली वाहणार आहेत .

Post Bottom Ad