मुंबई / प्रतिनिधी - बेस्टची आर्थिक स्थिती खराब असल्याने कामगारांना वेळेत पगार दिले जात नाहीत. याबाबत न्यायालयाने २० तारखेपर्यंत पगार देण्याचा आदेश दिला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा काही महिने २० तारखेला पगार होत आहे. बेस्ट कामगारांनी १८ जुलैला संपाबाबत मतदान घेण्याचा निर्णय घेतलं असताना २० तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येईल असे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी स्पष्ट केले आहे.
बेस्ट उपक्रम तोट्यात गेल्याने आपल्या विविध मागण्यासाठी बेस्टच्या सर्व कामगार संघटनांनी आंदोलनाची तयारी चालविली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून बेस् च्या विविध आगारात कर्मचाऱ्यांकडून मतदान घेण्यात येत आहे. यासाठी मंगळवार शेवटचा दिवस आहे. या मतदानाच्या आधारे वडाळा येथे संपाचा निर्णय होणार आहे. या मतदानात ३६ हजार कर्मचारी मतदान करणार आहे . या सर्व कर्मचाऱ्यांनी अनुकूलता दाखवल्यास सर्वच बेस्ट कामगार बुधवार १८ जुलै पासून संप पुकारणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट महाव्यस्थापकानीं बेस्ट कर्मचाऱ्यांना पगाराचे पैसे देण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन इतर देणी नंतर देऊन प्रथम बेस्ट कामगारांच्या वेतनाला प्राधान्य देणार असल्याची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट केले.