बांद्रयात जलवाहिनी फुटून दोन मुलांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2017

बांद्रयात जलवाहिनी फुटून दोन मुलांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या - रवी राजा


मुंबई / प्रतिनिधी - बांद्रे बेहरामपाडा येथील इंदिरा नगरात शुक्रवारी फुटलेल्या जलवाहिनीमुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झालं आहे. या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

बांद्रे बेहरामपाडा येथील इंदिरा नगरात शुक्रवारी सकाळी १०. ३५ वाजता वैतरणा येथून येणारी ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाणी बाजूच्या झोपड्यात घुसले. या घटनेत यावेळी अचानक तयार झालेल्या पाण्यात प्रवाहात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे अशी या दोन लहान मुलांची नावे आहेत. विघ्नेश अवघ्या 8 महिन्यांचा तर, प्रियंका नऊ वर्षांची होती. त्यांना तात्काळ नजीकच्या भाभा हॉस्पिटल आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. ही दोन्ही मृत मुले एकाच घरातील भावंडे आहेत. सहाय्यक आयुक्त एच पूर्व यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार या झोपड्या अनधिकृत बांधण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयामार्फत या झोपड्यांना ६ महिन्यात जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पाईप लाईन फुटल्याने ४ ते ५ लाख लिटर पाणी वाहून गेल्याची माहिती माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान बांद्रे येथे जलवाहिनी फुटून बाजूच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. या घटनेत घरात पाणी घुसल्याने अनेकांचे घरांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या घरांचे आपत्कालीन विभागाकडून सर्वे करून त्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी तसेच या घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही लहान मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये महापालिकेने आर्थिक सहाय्य द्यावे अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Post Bottom Ad