राज्यातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2017

राज्यातील कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - राजकुमार बडोले


मुंबई, दि. २७ : गेले काही वर्षे प्रलंबित असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात येईल. सुमारे दोन लाख ८५ हजार अर्ज प्रलंबित होते. ही सर्व प्रकरणे निकाली लावून शिष्यवृत्तीची सर्व रक्कम देण्यात येईल. तसेच या वर्षीपासून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी डी. बी. टी. हे वेब पोर्टल सुरु करण्यात येत असल्याची माहितीसामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

शिष्यवृत्ती देण्यासाठी विलंब का लागला, या उपप्रश्नाचे उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले, शिक्षण शुल्क समितीने अनेक महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले नव्हते. शुल्क निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयांकडून आलेले अनेक अर्ज अपूर्ण होते. याशिवाय इतर तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्ती देण्यास विलंब लागला. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळाला असल्याने टप्प्याटप्प्याने प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात येईल. ही कार्यवाही दोन ते तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य प्रा. अनिल सोले, निरंजन डावखरे, हरिभाऊ राठोड, नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये आणि धनंजय मुंडे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

Post Bottom Ad