पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2017

पावसाळी अधिवेशन २४ जुलैपासून

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०१७ चे तिसरे (पावसाळी) अधिवेशन २४ जुलै २०१७ पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन ११ ऑगस्ट २०१७ पर्यंत चालणार आहे. या १९ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात चार सुट्टयांचे दिवस असून एकूण कामकाजाचे १५ दिवस असणार आहेत.

कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधानपरिषदेचे कामकाज ठरविताना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विधानपरिषदेतील सर्व पक्षांचे गटनेते, वरिष्ठ सभासद उपस्थित होते.

शनिवार, २९ जुलै २०१७ रोजी बैठक होणार नाही तर रविवार, ३० जुलै २०१७ आणि रविवार, ६ ऑगस्ट २०१७ रोजी सार्वजनिक सुट्टी असणार आहे. सोमवार, ७ ऑगस्ट २०१७रोजी येणाऱ्या रक्षाबंधन निमित्ताने कामकाज होणार नाही. त्याऐवजी शनिवार, ५ ऑगस्ट २०१७रोजी कामकाज सुरु राहणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

Post Bottom Ad