उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वातानुकूलित अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे लोकार्पण होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 July 2017

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वातानुकूलित अभ्यासिका आणि ग्रंथालयाचे लोकार्पण होणार


मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शना खाली आमदार, विभाग प्रमुख, माजी महापौर मुंबई सुनील प्रभु यांनी दिंडोशी विधासभेतील सर्व शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत विधानसभा मतदारसंघातील प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रम सप्ताह आयोजित केला आहे. 

यात विभागात जागेच्या उपलब्धततेनुसार वृक्षारोपण, प्रत्येक प्रभागात आरोग्य शिबीर, दहावी - बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप, रक्तदान शिबिर, शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांचे वितरण, १ ली ते १० पर्यंतच्या विद्यार्थानां वह्या वाटप, नागरिकांसाठी छत्री वाटप, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर प्रज्ञा मैदानाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सप्ताहातील महत्वाचा लोकसेवेचा प्रकल्प स्व. अविनाश साळकर स्मृती, श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय संचालित वास्तूचे लोकार्पण पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दिनांक २५ जुलै रोजी होणार आहे. श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय या संस्थेला या क्षेत्रात काम करण्याचा मुंबई शहरात गेली सुमारे ९७ वर्षेअनुभव आहे आणि या संस्थेच्या मदतीने या वाचनालयाचे व्यवस्थापन आणि देखभाल केली जाणार आहे. हे वाचनालय स्व. अविनाश साळकर स्मृती श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय या नावाने चालविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका आणि नागरिकांसाठी हजारो पुस्तके-ग्रंथ उपलब्ध असलेले वाचनालय उभारण्याचे आश्वासन आमदार सुनील प्रभु यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कुरारवासीयां ना दिले होते. शिवसेनेच्या आश्वासनानुसार मालाड पूर्व येथील आकांशा अपार्टमेंटमध्ये तब्बल साडेतीन हजार चौरस फूट जागेत साकारण्यात आले आणि महापालिकेच्या सहकार्याने चालविण्यात येणार असून या वाचनालयात शालेय अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके, वाचनाची पुस्तके, ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर आश्वासनाची पूर्तता आता होत आहे. या वाचनालयाच्या उभारणीसाठी माजी नगरसेविका वारीसे, सायली वारीसे यांनी नगरसेवक निधी व माजी नगरसेवक गणपत वारीसे, आमदार सुनिल प्रभु यांनी वाचनालय निर्मितीसाठी व्यावसायिक सामाजिक जबादारी (CSR) निधी वापरून, पाठपुरावा करून सदर काम पूर्ण केले आहे.

या वाचनालयात विद्यार्थांना अभ्यासासाठी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वाचनाची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी समृद्ध ग्रंथ भांडार असल्यामुळे ही साहित्याची मेजवानी उपलब्द होणार असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी मोफत वायफाय देखील उपलब्द असणार आहे. यामुळे कुरारवासीयांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी गजानन कीर्तिकर व विधान सभा निवडणुकीवेळी सुनील प्रभु यांनी दिलेले वचन उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचाच हस्ते पूर्ण होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभाग संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान, नगरसेवक लक्ष्मण चाचे, विनया सावंत, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, गणपत वारीसे, प्रशांत कदम, सुनिल गुजर यांच्यासह सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना, ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मेहनत घेत आहेत.

Post Bottom Ad