शिक्षकांना शिक्षणाचे काम देऊन पालिका शाळांच्या निकालाचा टक्का वाढवा - शुभदा गुडेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2017

शिक्षकांना शिक्षणाचे काम देऊन पालिका शाळांच्या निकालाचा टक्का वाढवा - शुभदा गुडेकर


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना क्लार्कचे तस्सेच इतर कामे दिली जात असल्याने शाळांचा दहावीचा निकाल घटाला आहे. पालिका शाळांचा दहावीचा निकाल वाढवण्यासाठी शिक्षकांकडून करून घेतली जाणारी इतर कामे कमी करण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक शाळेसाठी एक क्लार्क देऊन शिक्षकांना या कामातून मुक्त करावे आणि पालिका शाळांचा निकालाचा टक्का वाढावा असे स्पष्ट आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त अनेक अतिरिक्त कामे करावी लागतात. यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर होतो. यावर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ६९ टक्के लागला असून तो गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी घटला आहे. याकडे लक्ष वेधताना शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी प्रशासनाला महापालिका शाळांचा निकाल वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जी कारभारामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी पी दक्षिण विभागातील सिद्धार्थनगर येथील शाळेचे उदाहरण दिले. या शाळेत दुरुस्तीचे काम सुरू असून दोन ते अडीच वर्षांच्या मुलांना चक्क धूळ पडलेल्या लादीवर बसवले जात असल्याचे त्यांनी आपल्या सरप्राइज व्हिजिटमध्ये निदर्शनास आल्याचे सांगितले. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती ओढवली असून अशा प्रकारामुळेच लोक महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना घालण्यास इच्छुक नसतात असेही त्या म्हणाल्या. मात्र यापुढे महापालिकेच्या शाळेत अशी गैरव्यवस्था आढळल्यास संबंधित अधिकार्‍याला ताबडतोब निलंबित करण्यात येईल असेही गुढेकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad