मुंबई / प्रतिनिधी -
सॅनिटरी नॅपकिन वरील जीएसटी कर रद्द करण्याची मागणी गेले कित्तेक दिवस करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे केंद्रातील भाजपा सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे महिलांच्या या मागणीकडे केंद्र व राज्य सरकाराचे लक्ष वेधण्यासाठी लातूरच्या विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात २१ जून पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सॅनिटरी नॅपकिन वरील जीएसटी कर कमी करावा, कर्क रुग्ण महिलांना सॅनिटरी नॅपकिन व आरोग्याच्या सुविधा मोफत द्याव्यात, माध्यमाइक शाळा व महाविदयालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवणे बंधनकारक करावे, महाविद्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्याबाबत जीआर काढावा, सॅनिटरी नॅपकिन बचत गटास चालवण्यास देऊन महिलां रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, रेशनिंगवर सॅनिटरी नॅपकिन उपल्बध करून द्यावेत या मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, वित्त मंत्री, महिला व बाळ कल्याण मंत्री यांची आम्ही भेट मागितली आहे. अद्याप आम्हाला कोणत्याही मंत्र्यांकडून भेटीसाठी निमंत्रण आलेले नाही. यामुळे आमचे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी दिली.