मुंबई / प्रतिनिधी - गोरेगाव येथील मुंबई महानगरपालिकेचे गोकूळ धाम प्रसुतिगृह वेश्या व्यवसाय आणि दारुड्यांचा अड्डा बनले आहे. याविरोधात भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी सहाय्यक आयुक्ताना पत्र देऊन हे गैरधंदे त्वरित बंद करावेत अशी मागणी केली आहे.
मुंबई महापालिकेने गोरेगाव येथे तीन मजली प्रसुतीगृह उभारले आहे. या विभागातील महिलांना प्रसुतिगृहाची सुविधा मिळावी, या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आली. इमारती बाहेर प्रसुतिगृहाचा फलक ही लावण्यात आला. परंतु, गेल्या तीन वर्षापासून हे प्रसुतीगृह सुरु झालेले नाही. त्यामुळे बंद असलेल्या या इमारतीत वेश्या व्यवसाय व दारुड्यांनी अड्डा बनवला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, अप्पा पाडा नागरी निवारा सहित आरे कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलांना प्रसुतिगृअभावी वंचित राहावे लागते. विशेष म्हणजे पालिकेच्या इमारतीत गैरप्रकार चालणे, ही पालिकेची नामुष्की आहे. अशा इमारतींमध्ये कोणतेही दुर्घटना झाल्यास त्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा आरोप , असा आरोप नगरसेविका प्रिती सातम यांनी केला आहे.