मुंबईत पाणी साचल्याच्या टिकेतून पळ काढण्यासाठी पालिकेची नवी शक्कल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2017

मुंबईत पाणी साचल्याच्या टिकेतून पळ काढण्यासाठी पालिकेची नवी शक्कल

पाणी साचण्याच्या ठिकाणांची आकडेवारी लपवली -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका व पालिकेचा आपत्कालीन विभाग दरवेळी पावसाचा अहवाल प्रसिद्ध करतो. या अहवालांमधून पाणी साचण्याच्या घटना किती घडल्या याची नेमकी आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. हीच आकडेवारी नंतर मीडियाला दिली जाते. अश्या आकडेवारीवरून पालिकेचे दवे फोल ठरत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्याने महापालिकेने पावसाच्या अहवालातून पाणी किती ठिकाणी साचले याची माहिती प्रसिद्ध करण्याचे टाळून आपल्यावर होणाऱ्या टिकेमधून पळ काढला आहे.

मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई चांगली झाल्याचा दावा करताना मुंबईत पाणी साचणार नाही असे म्हटले होते. त्यासाठी करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पम्पिंग स्टेशनचा उदो उदो करण्यात आला होता. मात्र मुंबईत पाऊस पडल्यावर ज्यावेळी हि पम्पिंग स्टेशन चालू असायला हवीत त्या वेळेत हि पम्पिंग स्टेशन बंद असल्याचे स्टेषयी समितीत प्रशासनाने खुलासा केला होता. यामुळे मुंबईत पाणी साचणार नाही असा पालिकेच्या दाव्या नंतरही मुंबईत ८ जुन रोजी पडलेल्या पावसामुळे तब्बल १४ ठिकाणी पाणी साचण्याच्या व १२ जून रोजी पडलेल्या पावसात तब्बल ४१ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. याच दरम्यान पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी एसडब्लूडी विभागाचे संचालक अक्षमण व्हटकर यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यामुळे पालिकेच्या नालेसफाईचे पितळ उघड एपडले होते.

यामुळे २४ व २५ जून रोजी मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. पाणी सचनळ्याची आकडेवारी प्रसिद्ध केल्यास पालिकेचे धिंडवडे निघतील आणि नालेसफाईचा पर्दा फाशी होईल या भीतीने पावसाबाबत बनवण्यात येणाऱ्या अहवालातून पाणी किती ठिकाणी साचले याची माहितीच प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पालिकेने अशी आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला आहे. अश्या प्रकार आकडेवारी लपवून मीडियामधून पालिकेवर व एसडब्लूडी विभागावर होणाऱ्या टिकेपासून पळ काढला असल्याचे बोलले जात आहे.

पावसाची आकडेवारी - 
मुंबईत २४ जून ते २५ जून सकाळी ८ पर्यंत २४ तासात कुलाबा येथे ५.२ मिमी व सांताक्रूझ येथे ३७ मिमी पावसाची नोंद झाली होती. या २४ तासात शहर विभागात ४.४६, पूर्व उपनगरात ९३.८६ मिमी, पश्चिम उपनगरात ३१.३२ मिमी पाऊस पडला. तर २५ जूनला सकाळी ८ ते दुपारी २.३० पर्यंत कुलाबा येथे ६३.२ मिमी व सांताक्रूझ ४८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २५ जूनला सुपारी ३ पर्यंत शहरात ५२.६४, पूर्व उपनगरात ३०.८७, पश्चिम उपनगरात २५.९० मिमी पावसाची नोंद झाली.

झाडे, घरांची पडझड -  
या पावसात शहरात १०, पूर्व उपनगरात १२, पश्चिम उपनगरात २६ अश्या ४८ झाडे पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. तर शहरात ७ व पश्चिम उपनगरात ७ अश्या एकूण १४ शॉर्ट सर्किटच्या घटनांची नोंद झाली आहे. या पावसादरम्यान शहरात १ व पूर्व उपनगरात ४ अश्या ५ घरे पडण्याच्या तक्रारी पालिकेकडे प्रपात झाल्या आहेत. यामध्ये मुलुंड पश्चिम राहुल नगर येथील मुलुंड दर्शन बिल्डिंग मागील भिंत कोसळून सुशीला सोनावणे (४२) व रंजिता कांबळे (२६) यांना मार लागला. या दोघीना अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाहतुकीवर परिणाम - 
पावसादरम्यान अनेक सखल भागात पाणी साचल्याने दहिसर सबवे, मागाठाणे येथील बेस्टच्या बसची वाहतूक एक तास १० मिनिटे वळवण्यात आली होती. तर मालाड येथील साईनाथ सबवे येथील वाहतूक दिड तास इतर पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. मुंबई प्रमाणेच ठाणे व पालघर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कळवा व ठाणे या स्थानकात पाणी साचांल्याने रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र रविवार हा सुट्टीचा वार असल्याने त्याचा प्रवाश्याना जास्त त्रास झाला नाही.

वेधशाळेचा अंदाज -  
कुलाबा वेधशाळेने सकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात हलक्या व तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र दुपारी एक दोन ठिकाणी मोठ्या पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या सारी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

२५ जून सकाळी ६ वाजता तलावातील पाणीसाठा
तलाव     पाऊस मिलीमीटर   पाण्याचा साठा

मोडक सागर       २८१                ४६४१०
तानसा               ३४०.४०           ४९९०१
विहार                  ८८                   ६०४७
तुलसी                 ७५                   २२६९
अप्पर वैतरणा    १६०                       ०
भातसा               १८४               ११३५६४
मध्य वैतरणा     २१८.३०          १०९३२७
एकूण                 २०१७            ३२७५१५
                          २०१६              ९४३०४
                          २०१५            ३१४७२३
                          २०१४            १४१०४९

Post Bottom Ad