मुंबई - मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईकर नागरिकांच्या पाणी दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सन 2012 साली दरवर्षी 8 टक्के पाणी करवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. त्याआधारे पाणी दरवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी होणा-या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र या प्रस्तावाला शिवसेना वगळता सर्व विरोधी पक्ष व भाजपाने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे स्थायी समितीत शिवसेना - भाजपामध्ये पाणी दरवाढीवरून सामना रंगणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने 2012 ला पाणी दरवाढीबाबत घेतलेला निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी हा प्रस्ताव रिओपन करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव गुरुवारी होणा-या स्थायी समितीत चर्चेला येणार आहे. प्रशासनाने पाणी पुरवठामध्ये वाढलेला खर्च समोर ठेऊन पाणी दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पाणी पुरवठा खर्च लक्षात घेऊन प्रशासनाने 19 पैसे ते 7 रुपया 54 पैसे की वाढ करण्याचे ठरवले आहे. याला भाजपने तीव्र विरोध केला आहे. प्रशासनाने पाणी दरवाढीचा प्रस्ताव आणूनही त्यावर शिवसेनेनैे कोणतीच भूमिका घेतलेली नाही. मुंबईकरांवर कोणत्याही करात वाढ करू देणार नाही, असे आश्वासन शिवसेनेने पालिका निवडणुकीत मुंबईकरांना दिले होते. याची आठवण करून देत भाजप या दरवाढीला विरोध करणार आहे, असल्याचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी म्ह्टले आहे. दरवाढीला विरोध करताना काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीकडूनही पाठींबा मिळणार असल्याने शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 2012 च्या निर्णयानुसार प्रशासनाला पाणी दरवाढ करणे शक्य झाले असले तरी हा प्रस्ताव पुन्हा रिओपन करून रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाणार आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा हा प्रस्ताव रिओपन करणार असून त्याला भाजप समर्थन करणार आहे. पाणी दरवाढीवरून गुरुवारी होणा-या स्थायी समितीत भाजप व विरोधक एकत्र येऊन तीव्र विरोध करण्याची तयारी केली असल्याने शिवसेना यावेळी एकाकी पडण्याची शक्यता आहे.
अशी होणार पाणी दरवाढ -
झोपड़पट्टी, चाळ आणि आदिवासी पाडा --- 19 पैसे
संक्रमण शिबिरांच्या इमारती -- 21 पैसे
व्यावसायिक संस्था -- 1 रुपया 89 पैसे
औद्योगिक कारखाने --- 2 रुपया 51 पैसे
फाईव्ह स्टार हॉटेल, रेसकोर्स --- 3 रुपया 77 पैसे
शीतपेये, पाणी बाटली आदीसाठी ---- 5 रुपया 24 पैसे
नियम 1.6 च्या अंतर्गत येणा-या इमारतीसाठी --- 7 रुपया 54 पैसे