पाणी दरवाढ कमी करण्यासाठी प्रस्ताव रिओपनची मागणी शिवसेनेने फेटाऴली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2017

पाणी दरवाढ कमी करण्यासाठी प्रस्ताव रिओपनची मागणी शिवसेनेने फेटाऴली

विरोधी पक्षांचा सभात्याग -
मुंबई - मुंबई महापालिकेने सन 2012 मध्ये पाण्यावर दरवर्षी 8 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यानुसार प्रशासन दरवर्षी दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ कमी करण्यासाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत सन 2012 चा प्रस्ताव रिओपन करण्याच्या सूचनेनुसार प्रस्ताव रिओपन करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी चर्चेविना फेटाळली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपसह काँग्रेस, सपा, राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करीत सभात्याग केला. दरम्यान पाणी दरवाढीमुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर 54 कोटी रुपयाचा भर पडणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबई करांच्या पाणी दरात जवळपास 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय़ घेतला आहे. 2012 साली घेतलेल्या निर्णयाच्या आधारे पाणी दरवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाचा आहे. मात्र या प्रस्तावाला भाजपसह विरोधकांनी तीव्र विरोध केला आहे. प्रशासनाने 2012 ला पाणी दरवाढीबाबत घेतलेला निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी हा प्रस्ताव रिओपन करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी स्थायी समिती सभेत केली. मात्र विरोधीपक्ष नेत्यांची प्रस्ताव रिओपन करण्याची सूचना चर्चा न करता नामंजूर केली. त्यावर भाजपसह विरोधीपक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत चर्चा करण्याची जोरदार मागणी केली. मात्र स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त विरोधकांनी अध्य़क्षांच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

पालिका निवडणुकीत मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करणार नाही, असे आश्वासन देणा-या शिवसेनेने मुंबईकरांवर छुप्या पध्दतीने पाणी दरवाढ करीत विश्वासघात केला असल्याची टीका विरोधकांक़डून केली जाते आहे. एकीकडे 500 चौरस फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ व 700 चौरस फुटापर्यंतचा मालमत्ता करात सवलत देण्यासाठी तयार असलेल्या सत्ताधारी शिवसेनेने मुंबईकरांचा पाणी दर वाढवण्याची खेळी केली आहे, असा आरोपही विरोधकांकडून केला जातो आहे.

प्रशासनाने पाणी पुरवठामध्ये वाढलेला खर्च समोर ठेऊन पाणी दरात 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पाणी पुरवठा खर्च लक्षात घेऊन प्रशासनाने 19 पैसे ते 7 रुपया 54 पैसे वाढ करण्याचे ठरवले आहे. प्रशासनाने पाणी दरवाढीचा प्रस्ताव आणूनही त्यावर शिवसेनेने कोणतीच भूमिका घेतली नाही. 2012 च्या निर्णयानुसार प्रशासनाला पाणी दरवाढ करणे शक्य झाले असले तरी हा प्रस्ताव पुन्हा रिओपन करून रद्द करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यावर मतदान घेतल्यास विरोधकांचे संख्याबळ जास्त होईल व प्रस्तावावर फेरविचार करावा लागेल या भितीने विरोधीपक्ष नेत्याचा प्रस्ताव रिओपन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने चर्चेविना फेटाळला अशी टीका केली जाते आहे. दरम्यान विरोधकांची सूचना फेटाऴण्यात आली असली तरी हा प्रस्ताव पुन्हा रिओपन करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी मुंबईकरांचे पाणी महागणार असेच चित्र आहे.


लोकशाहीची हत्या करणारा काऴा दिवस -
महानगरपालिकेत लोकशाहीची हत्या करणारा आजचा सर्वात काऴा दिवस आहे. पाणी दरवाढ प्रस्ताव रिओपन करून पाणी दरवाढ कमी करण्याची सूचना विरोधी पक्ष नेत्यांनी मांडली होती. मात्र त्यावर चर्चा न करता नामंजूर करण्याचा निर्णय घेणे निषेधार्थ आहे. अशा प्रकारे मुंबईकरांवर छुपा कर लादणे हा मुंबईकरांचा विश्वासघात आहे.
मनोज कोटक, भाजप गटनेता

शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला -
पाणी दरवाढ कमी करण्यासाठी 2012 चा प्रस्ताव रिओपन करण्याची सूचना मांडली होती. मात्र सत्ताधारी शिवसेनेने कोणतीही चर्चा न करता प्रस्ताव फेटाळणे हे निषेधार्थ आहे. निवडणुकीत मुंबईकरांवर कोणतीही करवाढ होऊ देणार नाही, असे सांगणा-या शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करून मुंबईकरांवर करवाढ लादली आहे.
रवी राजा, विरोधी पक्ष नेता

आम्हाला विश्वासात घेतले नाही -
आम्ही मुंबईकरांवर कोणतीही दरवाढ लादलेली नाही. २०१२ चा हा प्रस्ताव होता. सादर प्रस्ताव त्यावेळी बहुमताने मंजूर झाला होता. या प्रस्तावा प्रमाणे दरवर्षी ८ टक्के दरवाढ केली जात होती. यावर्षी प्रशासनाने ५.३९ टक्के दरवाढ केली आहे. जुना २०१२ चा प्रस्ताव रिओपन करायचा होता तर आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. आम्हाला विश्वासात न घेताच प्रस्ताव रिओपन करण्यासाठी पत्र देण्यात आले. जर आम्हाला सत्ताधारी म्हणून विश्वासात घेतले असते तर आम्हीही हा प्रस्ताव रिओपन करून रेकॉर्ड करायला लावला असता. यापुढेही जर आम्हाला विश्वासात घेऊन सदर प्रस्ताव रिओपन केल्यास आम्ही मुंबईकरांवर दरवाढ होऊच देणार नाही.
यशवंत जाधव, सभागृह नेते 

जुने व नवे दर --- (दर प्रतिहजार लिटर )
निवासी प्रकार                         जुने दर|       -- नवे दर
घरगुती ग्राहक -                         ४.६६       -- ४.९१ रू
बिगर व्यावसायिक संस्था -        १८.६६      -- १९.६७ रू
व्यावसायिक संस्था                   ३४.९९       -- ३७.८८ रू
उद्योग, कारखाने इ.                  ४६.६५      -- ४९.१६ रू
रेसकोर्स, तारांकीत हॉटेल्स -      ६९.९८       - ७३.७५ रू
शितपेये,बाटलीबंद पाणी उत्पादक ९७.२०   - १०२.४ रू

Post Bottom Ad