सिंधुदुर्गातील पॅनकार्ड गुंतवणूकदारांना सिंधुदुर्ग भाजपा न्याय मिळवून देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2017

सिंधुदुर्गातील पॅनकार्ड गुंतवणूकदारांना सिंधुदुर्ग भाजपा न्याय मिळवून देणार


सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पॅनकार्ड क्लबच्या नावे जवळपास शंभर कोटींपेक्षा जास्त ठेवी गोळा झाल्या आहेत. सदर ठेवींचा परतावा बंद झाला असून गुंतणूकदार हवालदिल झाले आहेत. त्यांच्या रोषाला सदर कंपनीचे एजंट बळी पडत आहेत. ठेवीदारांपैकी काही जण पैशाच्या वसुलीसाठी एजंटना धमक्या देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, महिलांना अश्लील शब्दात धमकावणे आदी गैरप्रकार करत आहेत. काही वेळा पोलिसांकडून अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवून घेण्यात स्वारस्य दाखवले जात नाही. आमच्या सिंधुदुर्गातील सर्वच्या सर्व गुंतवणुकीचा परतावा झाला पाहिजे, परंतु वसुलीसाठी गैरमार्ग अवलंबून कायदा हाती घेणाऱ्या काही गुंतवणूकदारावर कठोर कायदेशीर कारवाईची गरज आहे, हि आपली भूमिका असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यानी स्पष्ट केले आहे. 

गुंतवणूकदारांच्या कंपनी विरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्या! -
भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गचे जिल्हा पदाधिकारी बंड्या सावंत आणि भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक चव्हाण यांनी सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक गेडाम यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर चर्चा केली. यावेळी पॅनकार्ड ठेवीदारांच्या तक्रारी पोलीस स्टेशनवर नोंदवून घेतल्या जाव्यात अशी आग्रही मागणी केली. तसेच ठेवीदारांकडून एजंटना कशा प्रकारचा त्रास काही होत आहे, याची माहिती दिली.

एजंटना कायद्याचे संरक्षण - पोलिस अधिक्षकांचे ठाम आश्वासन -
आजवरच्या न्यायालयीन प्रक्रिये दरम्यानच्या काळात अनेक गुंतवणूदारांकडून कंपनीसाठी काम केलेल्या एजंटना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आजही पॅनकार्डच्या एजंटना मारहाणीच्या धमक्या, महिला प्रतिनिधींशी अश्लील वागणूक, शिविगाळ करणे, फोनवरुन धमक्या देणे अशा मानसिक आणि शारिरीक छळाला तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे या सर्व एजंटमध्ये घबराहट पसरली आहे. या एजंट ना पॅनकार्ड कंपनीचे प्रतिनिधी, किंवा मार्केटींग मध्ये कंपनीसोबत सहभागी असलेले वरीष्ठ अधिकारी किंवा कायद्याचे कोणतेही संरक्षण या प्रतिनिधींना योग्यरित्या मिळत नाही.

अशा कंपन्यां केंद्र शासनाच्य कायद्याने मान्यता घेऊन व वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करून व्यवसाय सुरू करत असल्याने अनेक बेरोजगार युवक-युवती या कंपन्यांसाठी एजंट म्हणून काम करत असतात व मिळणाऱ्या कमिशनवर स्वता:ची व कुटुंबाची उपजीविका चालवितात मात्र कंपनीकडून नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे शासकीय कारवाई होऊन कंपन्यांचा कारभार बंद केला जातो. त्यात एजंटचा दोष नसतानाही केवळ कंपन्या व गुंतवणूकदार यांच्या मधला दुवा म्हणून या एजंटना गुंतवणूकदारांच्या रोषाला बळी पडावे लागते. गुंतवणूकदार कायदा हातात घेऊन या एजंटना कशा प्रकारे त्रास देतात हे पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले गेले.

या गैर प्रकाराविरोधात भाजपचे सिंधुदुर्ग सांस्कृतिक आणि कला व क्रीडा आघाडीचे अध्यक्ष बंड्या सावंत आणि भाजपा युवा मोर्चेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक चव्हाण यांनी त्यांनी सिंधुदूर्ग जिल्हा पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधले. कायदा हातात घेणाऱ्या व गुंडागीरी करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या जीवघेण्या त्रासापासून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एजंटना दिलासा व संरक्षण देण्याची मागणी केली.

एजंट आणि गुंतवणूकदारांच्या कंपनी विरुद्ध तक्रारी नोंदवून घ्या - 
बंड्या सावंत आणि अभिषेक चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार अशा प्रकारच्या घटनांविरुद्ध तक्रार करण्यासाठी आलेल्या एजंटांच्या तक्रारी दाखल करुन घेण्याच्या सुचना व आदेश अखत्यारितील सर्व पोलिसस्थानके व तेथील अधिकाऱ्यांना द्यावेत व या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश देण्यात यावेत.तसेच सदर कंपनीच्या विरुद्ध सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदवून घेवून कंपनी विरुद्ध‍ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत जेणेकरुन कायदेशीर प्रक्रीये नंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळणे सोपे जाईल असे सांगितले.

Post Bottom Ad