18 ते 21 वयोगटातील मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी संपदा मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2017

18 ते 21 वयोगटातील मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविणार - जिल्हाधिकारी संपदा मेहता

मुंबई, दि. 22 : मुंबई शहरातील (2 लोकसभा व 10 विधानसभा मतदार संघामधील) 18 ते 21 वयोगटातील मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत राबविणार असल्याचे मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी आज येथे सांगितले. यावेळी प्रथमच पात्र महिला मतदारांची विशेष नोंदणी मोहिम राबविली जाणार असल्याचेही संपदा मेहता यांनी सांगितले.

मुंबई शहरात राबविण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर, अपर्णा सोमाणी-आरोलकर या उपस्थित होत्या.

यावेळी संपदा मेहता म्हणाल्या की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ते 31 जुलै 2017 या कालावधीत 18 ते 21 वर्षावरील मतदारांची नाव नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघ स्तरावर ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन 18 ते 21 वयोगटातील तरुण व पात्र मतदारांकडून नमुना 6 भरुन घेणार आहे.

विशेष मतदार नोंदणीची माहिती मान्यता प्राप्त राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना या कार्यक्रमास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 8 जुलै आणि 22 जुलै 2017 या सुट्टीच्या दिवशी जिल्हास्तरावर मतदार नोंदणी करीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमे अंतर्गत शासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये (महाविद्यालय) मतदान नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून National Contact Centre ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यावरुन नागरिकांना मतदार यादीबद्दल तसेच नांव नोंदणी संदर्भात माहिती पुरविण्यात येणार आहे.

Post Bottom Ad