महापौरांकडून अधिकाऱ्यांना दम प्रकरणाचे राजकीय पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2017

महापौरांकडून अधिकाऱ्यांना दम प्रकरणाचे राजकीय पडसाद


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईचे महापौर व प्रथम नागरिक असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला दम दिल्याच्या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महापौरांसारख्या सर्वोच्च अश्या पदावरच्याना अशी भाषा शोभणारी नाही अशी टिका भाजपाचे गटनेते यांनी केली आहे. तर महापौरांनी अधिकाऱ्यांना दम देण्यापेक्षा कारवाई करावी असे आवाहन काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.

वांद्रे येथील अनुज्ञाप्तीपत्रधारक स्टॉल्सधारकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेद्वारे त्यांच्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. ही तक्रार स्टॉलधारकांनी महापौरांकडे केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जितेंद्र नावाच्या पालिका अधिकाऱ्याला दम दिला आहे. आम्ही वरिष्ठांचे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, असे स्पष्टीकरण या अधिकाऱ्याने दिले. तसेच अटी व शर्तींंचा भंग केल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. त्यावर तुम्ही तरी कुठे नियमांचे पालन करता, आता तुला पण कामावरुन कमी केले पाहिजे, अशा प्रकारे महापौर महाडेश्वर यांनी या अधिकाऱ्याला दम दिला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांने वरिष्ठांशी बोलण्याची विनंती केल्यानंतर महापौरांनी पालिका आयुक्त अजोय मेहतांनाही दालनात बोलवून घेतो, तुम्ही ही इकडे या असे बोलल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये आहे.

या ऑडिओ क्लिप नंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. प्रकरणाबाबत बोलताना वांद्रे विभागात वाहतुकीची मोठी समस्या आहे, १६५ पैकी १८ स्टॉल धारकांना पालिकेने नोटीस दिली आहे. महापौरांसारख्या मोठ्या व्यक्तीने अधिकाऱ्यावर दबाव आणणे योग्य नाही. महापौरांनी धार्मिक मुद्दा पुढे करून धमकी देत आहेत हा प्रकार महापौरांना शोभा देणारा नाही असे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी म्हटले आहे. महापौरांनी आयुक्तांनाही बघून घेईन अस म्हटल आहे यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे यामुळे यावर आयुक्तांनी उत्तर द्यावं असे कोटक यांनी म्हटले आहे.

तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे. फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे तरीही फेरीवाला धोरण राबवले जात नाही. फेरीवाला धोरण राबवले जात नसताना फेरीवाल्यांवर व लहान दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून मनमानी कारवाई सुरुआहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात बिल्डर आणि कंत्राटदार बेकायदेशीर कामे करतात. अश्या बेकायदेशीर कामे करणाऱ्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना दम देण्यापेक्षा अश्या अधिकाऱ्यांवर कार्वायूई करावी असे आवाहन निरुपम यांनी केले आहे.

Post Bottom Ad