आयटीआय व शासकीय तांत्रिक विद्यालयामधील प्रशिक्षणार्थ्यांना लवकरच जीवन गट विमा योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2017

आयटीआय व शासकीय तांत्रिक विद्यालयामधील प्रशिक्षणार्थ्यांना लवकरच जीवन गट विमा योजना


मुंबई - राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयाधील प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून त्यांना चालू वर्षांपासून जीवन गट विमा योजना लागू करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज दिली. कौशल्य विकास विभागाच्या विविध घटकांचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. पाटील यांनी महाजन समिती अहवाल तसेच गेडाम समिती अहवालांची सद्यस्थिती,समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे, सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) अंतर्गत ॲडव्हान्स मॉड्युलचे सिटीएसमध्ये रूपांतर करण्याबाबत आणि या योजनेतील मंजूर पदांचे समायोजन याबाबत सद्यस्थिती, तासिका तत्त्वावरील निदेशकांचे मानधन वाढविणे, गट-अ ते गट-क पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरणे याबाबत आढावा घेतला. द्विस्तरीय अभ्यासक्रम प्रक्रिया संपूर्ण बदलण्याची गरज असून राज्यातील कमी मागणीचे अभ्यासक्रम असलेल्या ५३२ तुकड्या या जास्त मागणीच्या अभ्यासक्रमासाठी वर्ग करणे यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.

Post Bottom Ad