बांग्लादेशातील अत्याचाराविरोधात बौद्ध भिक्कूची निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 June 2017

बांग्लादेशातील अत्याचाराविरोधात बौद्ध भिक्कूची निदर्शने


मुंबई / प्रतिनिधी -  बांग्लादेशात अल्पसंख्यांक, ख्रिश्चन, बौद्ध समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरु आहेत. या अन्याय अत्याचार विरोधात भारतासारख्या एका प्रबळ देशाने दाखल घ्यावी या मागणीसाठी अखिल भारतीय भिक्कू संघाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात शांततामे निदर्शने केली. भन्ते रतनज्योती, भन्ते लामा, भन्ते करुणाज्योती यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी बांग्लादेशातील अल्पसंख्याक बौद्धांवरील समाजावरील अन्याय अत्याचार बंद व्हावा या मागणीचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना देण्यात आली. बांग्लादेशातील अत्याचाराविरोधात भारताने दखल घ्यावी म्हणून केंद्रीय परराष्ट्र मंत्री, प्रधानमंत्री व राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले तसेच मुंबईमधील कंबोडिया, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या राजदूता वासाची भेट घेतली जाणार असल्याचे भिक्कू संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad