मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. या रुग्णालयाच्या इमारतीत कोसळणारे स्लॅब, भिंतींना तडे, फाटलेल्या बेडशिट, स्वच्छतागृहांना दरवाजे - कड्या नाहीत अशी अवस्था पाहायला मिळत आहे. यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जीव मुठीत धरून रुग्णालयात रहावे लागत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीही मिळत नाही अश्या शेकडो तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरत गैरसोयींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई उपनगरातील सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाचा फायदा मुंबई आणि मुंबईबाहेरील हजारो रुग्णांना होतो. मात्र या रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या ठिकाणी अनेक वेळा अचानक स्लॅब कोसळ्याच्या घटना घडतात. रुग्णालयाच्या भिंतींना तडे गेल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना भितीच्या छायेखाली रहावे लागते. रुग्णांना दिल्या जाणार्या बेडशिट फाटलेल्या असतात. रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २ मध्ये तर चक्क स्लॅबला टेकू लावून ठेवण्यात आले आले आहेत. रुग्णालयाच्या या अवस्थेमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांनी रुग्णालयाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी सायन रुग्णालयाच्या दुरुस्ती आणि देखभालीचे कंत्राट दिलेल्या ‘किंजल’ कंपनीने एप्रिलची मुदत संपल्यानंतरही काम पूर्ण केले नाही. तरीही पुन्हा याच कंपनीला देखभाल - दुरुस्तीचे कंत्राट १८ महिन्यांची मुदतवाढ देऊन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी संबंधित कामांना वाढीव दर देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सध्याच्या स्थितीला संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, उप अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार -
सायन रुग्णालयात सध्या एन्जिओप्लास्टी, अॅन्जिओग्राफी होणार्या कालबाह्य मशीन्स आहेत. या मशीन काढून नवीन मशीन आणल्या तरी त्या ठेवायलाही जागा नाही. संपूर्ण रुग्णालयाचीच अवस्था दयनीय झाली आहे. या स्थितीला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. त्यामुळे त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. या रुग्णालयाच्या या स्थितीला जबाबदार असणार्या सर्व अधिकार्यांची चौकशी करून कारवाई करावी असे निर्देशही प्रशासनाला दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.