मुंबई / प्रतिनिधी -
न्यायालयाच्या आदेशाने तानसा पाईप लाईन वरील झोपड्या पालिकेने तोडल्या मात्र त्याचे रॅबिट उचलले नसल्याने घाटकोपर पश्चिम येथील कातोडीपाडा येथे पालिकेच्या दुर्लक्षामुळे दुसऱ्यांदा अपघात घडला आहे. या अपघातात एका अडीच वर्षाचा मुलगा जखमी झाला असून राजावाडी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगत मुंबईत सर्वत्र तानसा पाईप लाईनच्या बाजूच्या झोपड्या तोडल्या आहेत. घाटकोपर पश्चिम वॉर्ड क्रमांक १२७ येथील कातोडीपाडा येथील कातोडीपाडा ते रामनगर डक लाईन या विभागातील तानसा पाईप लाईन अस्तित्वात नाही. असे असतानाही या ठिकाणच्या झोपड्या मे महिन्यात तोडण्यात आल्या होत्या. एक महिना होऊनही या तोडलेल्या झोपड्यांचे रॅबिट उचलले नसल्याने १० जूनला पावसाच्या पाण्यात हे रॅबिट डोंगरावरून खाली येऊन संरक्षण भिंत तोडून काही घरांचे नुकसान झाले होते.
याबाबत मीडियामध्ये आलेल्या बातम्यांची दाखल घेत प्रभाग समिती अध्यक्ष तुकाराम पाटील आणि सहाय्य्क आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी या ठिकाणी भेट देत रॅबिट उचलण्याचे आदेश दिले होते. काही ठिकाणचे रॅबिट उचलण्यात आले तर काही ठिकाणी झोपड्या तोडून डिड महिना झाला तरी अद्याप रॅबिट असेच पडून आहे.
शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा पावसाच्या पाण्याबरोबर रॅबिट खाली येऊन कुंभार चाळीवर कोसळले. यात तीन घरांचे नुकसान झाले असून अलोक सहानी हा अडीच वारसाचा मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलाची विचारपूस करण्यासाठी माजी नगरसेविका रितू तावडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घातली आहे. दरम्यान कातोडीपाड्यात गेल्या १० दिवसात हि दुसरी घटना घडली आहे यामुळे नागरिकांमध्ये पालिकेच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.