महापौरांनी पालिका अधिकाऱ्याला दम दिल्याची ऑडिओ क्लिप झाली वायरल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2017

महापौरांनी पालिका अधिकाऱ्याला दम दिल्याची ऑडिओ क्लिप झाली वायरल


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सध्या मुंबईत अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात येत आहे. अशी अटी व शर्तींचा भंग केल्या प्रकरणी कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दूरध्वनीवरून दम दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. नियमानुसार तुम्ही ही काम करा, अन्यथा तुम्हाला निलंबित करावे लागेल, असा महापौरांनी या अधिकाऱ्याला दूरध्वनीवरुन दम दिल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वांद्रे येथील अनुज्ञाप्तीपत्रधारक स्टॉल्सधारकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेद्वारे त्यांच्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. ही तक्रार स्टॉलधारकांनी महापौरांकडे केल्यानंतर त्यांनी याप्रकरणी जितेंद्र नावाच्या पालिका अधिकाऱ्याला जाब विचारला. आम्ही वरिष्ठांचे आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, असे स्पष्टीकरण या अधिकाऱ्याने दिले. तसेच अटी व शर्तींंचा भंग केल्यामुळे कारवाई केल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. त्यावर तुम्ही तरी कुठे नियमांचे पालन करता, असा जाब विचारत आता तुला पण कामावरुन कमी केले पाहिजे, अशा प्रकारे महापौर महाडेश्वर यांनी अधिकाऱ्याला दम दिला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांने वरिष्ठांशी बोलण्याची विनंती केल्यानंतर महापौरांनी पालिका आयुक्त अजोय मेहतांनाही दालनात बोलवून घेतो, तुम्ही ही इकडे या असे बोलल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये आहे.

दरम्यान, चाळीस वर्षापूर्वीपासूनचे स्टॉल असून ते परवानाधारक होते. याबाबत मी अधिकाऱ्यांना विचारणा केली. यावेळी हे स्टॉल बेकादेशीर असतील तर ते तोडायला हवेत. पण अटी व शर्तींचा भंग केला असेल तर कायदेशीर कारवाई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच करायला हवी होती. मग ती आजवर का केली गेली नव्हती. नियमाचा आधार घेवून हे अधिकारी त्यांना एवढे दिवस का वाचवत होते. ते बेकायदेशीर होते तर त्यांच्यावर आजवर कारवाई का झाली नाही. त्यांचे स्टॉल जर बेकायदेशीरपणे होते तर आता अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असा जाब विचारल्याचे महापौरांनी सांगितले.

Post Bottom Ad