धनगर समाज काढणार एसटी आरक्षण स्मरण यात्रा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2017

धनगर समाज काढणार एसटी आरक्षण स्मरण यात्रा

मुंबई - अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाजाचे आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाजाने स्मरण न्याय यात्रा आणि दिल्लीत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या अनेक संघटनांनी एसटी आरक्षणासंदर्भातील आंदोलनाची तयारी पुन्हा सुरु केली आहे.  पंढरपूर ते बारामती या मार्गावर धनगर समाजाची एसटी आरक्षण स्मरण न्याययात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान निघणार आहे. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनकाळात दिल्लीत जंतर मंतर येथे समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध संघटनांकडून तालुका आणि जिल्हा बैठका घेतल्या जात आहेत.  २१ जुलै हा दिवस आंदोलनाचा प्रेरणा दिवस म्हणूनही धनगर समाज साजरा करणार आहे. १५ जुलै पासून सुरु होणाऱ्या एसटी आरक्षण स्मरण न्याय यात्रेत समाजाचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. ही यात्रा बारामती आंदोलनाची पुन्हा आठवण करुन देईल, असे यशवंत धनगर आरक्षण क्रांती सनेचे अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी सांगितले.

Post Bottom Ad