कुटुंबासह १०० रुपयात पेंग्विन पाहता येणार - इतरांना मात्र वेगळे शुल्क - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2017

कुटुंबासह १०० रुपयात पेंग्विन पाहता येणार - इतरांना मात्र वेगळे शुल्क

- मॉर्निग वॉकसाठीच्या पास दरात ५ पट वाढ 
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या विरमाता जिजामाता उद्यानातील हम्बोल्ड पेंग्विन पाहण्यासाठी प्रति कुटुंब १०० रुपये दर आकारण्याचा निर्णय शनिवारी संपन्न झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संपूर्ण कुटुंबाला पेंग्विन पाहता यावे म्हणून एकाच कुटुंबातील आई वडील आणि त्यांची दोन मुल यांनाच हिरावला लागू असेल. सदर प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीत व सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर हे दार लागू होणार आहे. तूर्तास मुंबईकरांना पेंग्विन मोफत पाहता येणार आहेत अशी माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली.

१७ मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वीर जिजामाता प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन कक्षाचे लोकार्पण झाले. त्यानंतर राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. सुट्टीच्या दिवशी गर्दी मोठ्या संख्येने वाढत असल्याने अनेकांना पेंग्विन पाहता आलेले नाहीत. ३१ मार्चपर्यंत पेंग्विन मोफत पाहता येतील अशी घोषणा करण्यात आली होती. १ एप्रिलपासून मोठ्याना १०० आणि लहान मुलांना ५० रुपये दर आकारण्यात येणार होते तसेच राणीबागेत प्रवेश शुल्क सुद्धा वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निवडणुकीच्या आधी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावावर कोणतंही निर्णय घेण्यात आला नव्हता. यामुळे गटनेत्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी शाळांमधील ३ ते १२ वर्षांमधील विदयार्थ्यांना २५ रुपये, एका कुटुंबा व्यतिरिक्त एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहे. मुलांसोबत नसलेल्या पती पत्नी व्यतिरिक्त एखादा प्रौढ व्यक्ती किंवा दोन प्रौढ व्यक्ती पेंग्विन पाहण्यास आल्यास त्यांना प्रत्येकी १०० रुपये तर त्यांच्यासह आलेल्या मुलांना प्रत्येकी २५ रुपये शुल्क लागू केले जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झालेला हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीत व नंतर पालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे. सभागृहाच्या मंजुरी नंतर पेंग्विन पाहण्यासाठीचे शुल्क आकारण्यात येईल तो पर्यंत पेंग्विन पाहण्यासाठी मोफत मिळणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

मॉर्निंग वॉकसाठीचा पास ५ पटीने वाढला 
पेंग्विन दर्शनाबरोबरच उद्यानात सकाळी मॉर्निंग वॉकला लोक मोठ्या संख्येने येत असतात. अश्या लोकांकडून उद्यान प्रशासन दरमहा ३० रुपये आकारात असते. या ३० रुपयात महिनाभराचा पास दिला जात होता. पासच्या दरात ५ पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना आता महिन्याला ३० रुपयां ऐवजी १५० रुपये मोजावे लागणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS