मुंबई - अतिमहत्त्वाच्या शहराच्या आणि मुंबईचा प्रथम नागरिक असलेल्या मुंबईच्या महापौरांना राजशिष्टारांमध्ये कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी पालिका सभागृह नेते यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. ही ठरावाची सूचना येत्या महासभेत मांडण्यात यावी, असे पत्र सभागृहनेते यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पाठवले आहे.
मुंबईचे महापौर हे पद विशेष पद आहे. महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईचे महापौर आहेत. राज्यभरातील महापौरांचे अधिकार वाढवण्याबाबत माजी महापौर स्नेहल आंबेकर व त्यापूर्वीच्या महापौरांनी पत्राद्वारे राज्य सरकारकडे मागणी केली होती. आता सभागृहनेते यशवंत जाधव यांनी महापौरांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. अशा या महत्त्वाच्या शहराच्या आणि मुंबईचा प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे सर्वोच्च असणो आवश्यक आहे, मुंबईमध्ये येणार्या देशातील व परदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबई महापालिकेला भेटी देतात. त्यामुळे मुंबईच्या महापौरांना वरिष्ठ दर्जा मिळणे आवश्यक आहे असे जाधव यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.
No comments:
Post a Comment