धोकादायक इमारतींची पाहणी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2017

धोकादायक इमारतींची पाहणी होणार

मुंबई (प्रतिनिधी)- माझगाव येथील बीआयटी इमारतींना धोकादायक ठरवून रहिवाशांना घरे रिकामी करण्याचा तगादा पालिकेने लावला आहे. या नोटीसांना सभागृहनेते नेते यशवंत जाधव यांनी स्थायी समितीत आव्हान देत सदर इमारतींची दुरुस्ती करणे शक्य असल्याचा दावा केला. तसेच या इमारती धोकादायक आहेत का ? याची शहनिशा करण्यासाठी पाहणी करण्याची आग्रही मागणी केली. यामागणीनुसार समिती अध्यक्षांनी इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करावा, अशा सुचना प्रशासनाला केल्या आहेत.


माजगाव येथे महापालिकेच्या वसाहती आहेत. ताडवाडीतील १६ इमारती या बॉम्बे इम्प्रोव्हमेन्ट ट्रस्टमार्फत १९२२ मध्ये बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये हजारहून अधिक रहिवाशी राहतात. यापैकी काही इमारती ब्रिटिशकालीन असल्याने धोकादायक स्थितीत आहेत. तर काहींना सी १ म्हणजे अतिधोकादायक यादीत टाकत इमारत रिकाम्या करण्यास भाग पाडण्यात येत आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना माहुल येथे स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र येथे जाण्यास रहिवाशी तयार नाहीत. त्यामुळे पालिकेने इमारतींचे वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु केली होती. इमारतीच्या स्थर्याची चाचपणी स्थानिकांनी अन्य मार्गाने केली असता या इमारतींची दुरुस्ती शक्य असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणाची चौकशी करून इमारतींच्या स्थेर्यतेची चाचपणी करण्यात यावी, यासाठी पाहणी करण्याची मागणी जाधव यांनी केली. 

याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी कमकुवत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात येते असे स्पष्ट केले. मात्र त्या पुढे ४५ टक्क्यांहून अधिक धोकादायक आढळणाऱ्या इमारती पडूनच त्यांची पुनर्बांधणी केली जात असल्याचे सांगितले. त्यानुसार या इमारतींची पहाणी करून स्थायी समितीपुढे त्याचा अहवाल ठेवल्यानंतर या धोकादायक इमारतींचे भवितव्य ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad