मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत दरवर्षी अस्वच्छता, दुर्गंधी, डासांची, उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने रोगाराई पसरत असते. यावर उपाय म्हणून कुर्ला एल विभागातील 16 वार्डमध्ये पावसाळयापूर्वी विशेष स्वच्छता मोहिम हाती घेवुन कुर्ला कचरामुक्त करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती एल विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी दिली.
कुर्ला एल विभाग येथील वार्ड क्रमांक 156 ते 171 या 16 प्रभागांमध्ये 6 एप्रिल ते 1 जून या कालावधीत प्रभागातील दोन टप्प्यामध्ये कचरा मुक्तीचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्रत्तेक प्रभागात 3 दिवस विशेष स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कचरामुक्तिच्या या अभियानात घनकचरा व्यवस्थापन, किटकनाशक फवारणी, परिरक्षण विभाग आरोग्य विभाग तसेच पालिकेचे इतर विभाग सहभागी होणार आहेत. हे विशेष स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षाचे नगरसेवक आपल्या प्रभागात अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोक सहभाग सुद्धा महत्वाचा असल्याचे लांडे यांनी सांगितले.