राज्य पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर, आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहीणी कांबळे यांच्यासह पालिका आयुक्त अजोय मेहता, अतिरीक्त आयुक्त संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे युनोस्कोने राज्यातील ऐतिहासीक रेल्वे स्थानक म्हणून घोषित केले आहे. सीएसटी रेल्वे स्थानकाची इमारत ही ताजमहाल नंतर छायाचित्रणासाठी देशातील प्रेक्षणिय इमारत म्हणून ओळखली जाते. त्यालगत असणारी महापालिकेची मुख्य इमारत ही सुध्दा देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे. या दोन्ही ऐतिहासीक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येत असतात. संपूर्ण इमारतीसह आपला सेल्फी टिपण्यासाठी भर रस्त्यात उभ राहून सेल्फी काढतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन पर्यटकांच्या जिविताला धोका होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने सीएसटी सब वेच्या वरील भागात पर्यटकांसाठी सेल्फी पॉईट उभारले आहे. या सेल्फी पॉईंटमधून महापालिकेची अत्यंत देखणी अशी वास्तू दिसते. ही वास्तू खरोखरच बघण्यासारखी असून मी इथे आल्याबरोबर सेल्फी काढली. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनससारखी अत्यंत सुंदर वास्तू आहे. अशाप्रकारे ३६० अंशातून पर्यटकांना छायाचित्रे घेता येतील. देशभरातून आणि परदेशातून येणा-या पर्यटकांमुळे या दर्शनी गॅलरीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त होईल. पर्यटकांची संख्या वाढेल, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सेल्फी पॉंईट मुंबईत इतर ठिकाणीही उभारणा का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, अशाप्रकारच्या गॅलरी मुंबईत इतरत्रही उभारण्यात येतील. जेणेकरून मुंबईतील हेरीटेज आणि देखण्या वास्तूंची छायाचित्रांद्वारे माहिती घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी पर्यटकांसाठी सेल्फी पॉंईट उभारण्यास पालिकेने घेतलेल्या मेहनतीबद्दल आयुक्त अजोय मेहता आणि सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांचे अभिनंदन केले व नगरसेवकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment